पोस्ट्स

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इमेज
  जि प प्रा शा संगम येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील मौजे संगम येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापक अशोक नावंदे सर  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अच्युतराव चव्हाण गोरे,उपसरपंच कामाळे ,सर्व सदस्य ग्रा पं संगम,शा व्य समिती अध्यक्ष नवनाथराव नागरगोजे, शिक्षक श्री महादेव गित्ते सर ,सुभाष कोंकेवाड सर,श्रीम. कल्पना बडे मॅडम, श्रीम. बबिता शिंदे मॅडम,श्री ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जि प प्रा शा संगम शाळेमध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ, बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा तसेच निपुण भारत प्रतिज्ञा आझादी का अमृत महोत्सव व विविध विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य या विषयावर आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली शोभा वाढवली.यावेळी श्री प्रमोद(लक्की ) नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीची वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्य दिन

इमेज
  परचुंडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सरपंच सौ. मीना गुरुलिंगआप्पा नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक श्री दशरथ गोरे,उपसरपंच बाळासाहेब थोरात ,मा. उपसरपंच वैजेनाथ पत्रवाळे मुख्याध्यापक  लक्ष्मण आजले सर ,शिक्षक श्री निलेवार सचिन सर व ग्रा. प. सदस्य ओम पत्रवाळे, माऊली नावंदे, फोटोग्राफर गणेश पत्रावळे  यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जि प प्रा शा परचुंडी शाळेमध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ, बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा तसेच निपुण भारत प्रतिज्ञा आझादी का अमृत महोत्सव व विविध विद्यार्थ्यांनी भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गावातील महिला तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण

इमेज
  नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.         शहरातील नगर परिषद कार्यालय येथे "भारतीय स्वातंत्र्य दिन " सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी  मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या शुभहस्ते पवित्र अशा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदचे मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याकार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी,  दतात्रय ढवळे, राजेंद्र सोनी, वैजनाथ बागवाले, रविमूळे, बद्दरभाई, सौ. अन्नपूर्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. नगर परिषदेचे  कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे सह नगर परिषदचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंच

वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राचार्य ,डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन  परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाची प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पासून या दिवसाला  ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताला मुक्त करण्यासाठी आनेक शूरवीरांनी प्राणाची आहुती दिली व भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. तेव्हा पासून आपण हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत आहोत. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव आप्पा मुंडे, उपाध्यक्ष टी.पी .मुंडे, संस्थेचे सचिव दत्ताप्पा इटके यांच्यासह इतर संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयन कुमार आचार्य यांनी केले.तसेच रसायनशास्त्र विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थे

मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

इमेज
  ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचे हस्ते किनगावकर झाली राधाकृष्ण' मुर्तीची प्राणप्रतिष्ठा   किनगाव (प्रतिनिधी)   संतवाङ्मयाचे संशोधक तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या पवित्र हस्ते 'श्रीराधाकृष्ण'मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा  दिनांक १५आँगस्ट रोजी संपन्न झाला.              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री बाबासाहेब पाटील, तर प्रमुख पाहुणे विनायकराव पाटील माजी मंत्री . श्री.प्रविण फुलारी साहेब उपजिल्हाधिकारी अहमदपूर,श्री बब्रुवानजी खंदाडे माजी आमदार, डॉ.हरिश्चंद्र वंगे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक, डॉ.दे.घ.मुंडे विचारवंत,सौ.स्मिता देशमुख गीतावाचक, डॉ.अमोल पागे कृष्णभक्त, तुकाराम फड महाराज हिंगणगाव,ॲड. अनिलराव नवटके अध्यक्ष वकील संघ अहमदपूर,डॉ.दे.घ.मुंडे विचारवंत आदिंच्या उपस्थित हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी सामुदायिक गीतापाठ व सुप्रसिद्ध गायिका गानकोकिळा गोदावरीताई मुंडे यांचे गायनाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कार्यक्रमाचे  संयोजक ॲड. सुनील रामराव केंद्रे, श्री अनिल केंद्रे,श्री किशोर केंद्रे (माजी नगरसेवक परळी),

हुतात्मा स्मारक कोनशिलेचे भूमिपूजन

इमेज
  प्रा.डॉ.बळीराम पांडे यांचा तिरुका ग्रामस्थानी केला सन्मान मराठवाडा (प्रतिनिधी...)तिरुका येथील  भूमिपुत्र तथा देवगिरी महाविद्यालयातील  अर्थशास्त्र विभागाचे  अभ्यासु प्राध्यापक  डॉ. बळीराम पांडे यांचा सन्मान तिरूका ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.                     प्रा.डॉ.बळीराम पांडे यांना ध्वजारोहण करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते.याप्रसंगी डॉ.पांडे यांना मायेची, विश्वासाची शाल पांघरण्यात आली. अन् कित्येक वर्षाच्या त्यांच्या हरवलेल्या आनंदाश्रूंना त्यांना आवरता आले नाही.आत्यंतिक भावस्पर्शी असा हा कार्यक्रम संपन्न झाला.स्वातंत्र्य सेनानी संग्राम आत्माराम पांडे यांचा कर्तृत्ववान, समाजशील नातू म्हणून हा सन्मान त्यांना देण्यात आला.यावेळी स्वातंत्र्य सेनानी संग्राम आत्माराम  पांडे आणि त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील  सहकारी यांच्या स्मृती जपण्यासाठी तिरुका ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारक कोनशीलेचे भूमिपूजनही प्रा.डॉ.बळीराम पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने प्रा.पांडे यांनी त्यांच्या जीवनप्रवासातील कटूगोड आठवणींना उजाळा दिला.त्यांच्

स्वातंत्र्य दिन उत्साहात

इमेज
  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ग्रामपंचायत कासारवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कासारवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे तसेच उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी घेतली. बालविवाहास कोणीही प्रोत्साहन देणार नाही अथवा मदत करणार नाही असे गावकऱ्यांनी आश्वासन दिले.  त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विविध महात्म्यांची तसेच स्वातंत्र्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमिका घेणारे विद्यार्थी शोभून दिसत होते. ढोल, ताशा, हलगी यांच्या गजरामध्ये विद्यार्थी बालविवाहाच्या आणि भारत मातेच्या घोषणा देत होते. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांचाही मोठा सहभाग हो

परळीत विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इमेज
  परळीत विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी / प्रतिनिधी      स्वातंत्र्य दिनाचे ओेैचित्य व हर घर तिरंगा अंतर्गत मंगळवार दि 15 ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी देशाचा स्वतंत्र दिन मोठया हर्ष उल्हासात परळीत विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. महाराष्ट्र विद्यालय: https://t.ly/t8f5f  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल: https://t.ly/F5p2y  सनराईज इंग्लिश स्कुल: https://t.ly/53GhY  परळी शहर  काँग्रेस: https://t.ly/RH4_-  भेल संस्कार केंद्र संकुल:  https://t.ly/6V5NT ● *विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

स्वातंत्र्य दिन :चिरायू होवो

इमेज
  महाराष्ट्र विद्यालय संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी / प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे ओेैचित्य व हर घर तिरंगा अंतर्गत मंगळवार दि 15 ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी देशाचा स्वतंत्र दिन मोठया हर्ष उल्हासात परळी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय संकुलात साजरा करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख,सुदाम शिंदे,सखाराम शिंदे,गावचे सरपंच यांच्यासह ग्रामीण बँक,आरोग्य केंद्र,सेवा सोसायटी यांचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी,गावातील तरुण आदी सह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्या मध्ये वक्तृत्व, देशभक्तीपर गीतांचे गायन, सामुहिक नृत्य रंगमंचावर सादर केले.  या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सृजनात्मक विकासाला चालना देणाऱ्या टॉय बँक उपक्रमांतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक खेळणी उपस्थित मान्यवर व पालकांच्या हस्ते शाळांना सुपूर्द करण्यात आल्या. या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचलनसांस

स्वातंत्र्य दिन: चिरायू होवो

इमेज
  परळी शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी प्रतिनिधी  भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने परळी शहर काँग्रेस पक्षाच्या वतिने परळी शहरातील विजयस्तंभ व काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रीय ध्वजारोहण करुन उत्साहात साजरा करण्यात आला.     सकाळी 8-15 वाजता मोंढा मार्केट परिसरात असलेल्या विजयस्तंभ येथे राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या हस्ते तर काँग्रेस पक्षाच्या परळी शहरातील मध्यवर्ती असलेल्या पक्ष कार्यालयात 7-45 मि. काँग्रेस नेते नरेश अप्पा हलगे यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान या दोन्हीही ठिकाणी  राष्ट्रपिता महात्मा गांधी व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.स्वातंत्र्याचा या अमृत महोत्सवी वर्षाचे हर्षाउत्साहात स्वागत करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस अनिल मुंढे,उपाध्यक्ष वसंत मुंढे,माजी शहर अध्यक्ष प्रकाशराव देशमुख,विजय अवस्ती, मुळे मामा, लाहुदास तांदळे,रामराज्य देशमुख,नरेश अप्पा हलगे,गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी शरद पवार गट शहर अध्यक्ष जीवन देशमुख, मेहबूब भाई कुरेशी,माज

सनराईज इंग्लिश स्कुल मधून सक्षम विद्यार्थी व उद्याचे सुजाण नागरिक घडतील - डॉ.अरुण गुट्टे

इमेज
सनराईज इंग्लिश स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन  विविध उपक्रमांनी साजरा परळी वैजनाथ  प्रतिनिधी:- येथील परिवर्तन युवा मंच संचलित सनराईज इंग्लिश स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.सनराईज इंग्लिश स्कुल मधून सक्षम विद्यार्थी व उद्याचे सुजाण नागरिक घडतील  असे प्रतिपादन परळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण गुट्टे यांनी व्यक्त केले.ते सनराईन इंग्लिश स्कुल आयोजित स्वातंत्र्य दिन महोत्सवात बोलत होते .पुढे बोलतांना ते म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक, नैतिक, बौद्धिक, शारिरीक, सामाजिक कौशल्यांची सर्वसमावेशक पेरणी करून त्यांचा संतुलित व  सर्वांगीण विकास साधणे ही शिक्षकांची मुख्य जबाबदारी आहे.मुलांचे मातीशी असलेले नाते, सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जिव्हाळा, संस्कार यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलात तो राहत असलेल्या प्रदेशाची, पर्यावरणाची जाणीव निर्माण होईल. असे सक्षम विद्यार्थी व  उद्याचे सुजाण नागरिक सनराईज इंग्लिश स्कुल मधून घडतील असा विश्वास परळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण गुट्टे यांनी या प्रसंगी व्यक्त केला. परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे

स्वातंत्र्य दिन: चिरायू होवो

इमेज
  भेल संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा   परळी वैजनाथ: प्रतिनिधी...        येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित "भेल संस्कार केंद्रामध्ये" भारत सरकार आयोजित "हर घर तिरंगा" या अभियानाद्वारे तीन दिवसीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी हर्षोल्लसात साजरा केला गेला.       याप्रसंगी दिनांक 13/ 8/ 2023 रोजी डॉ. सतीश रायते  तर दिनांक 14/8/ 2023 रोजी  गिरीश ठाकूर  यांच्या हस्ते तर 15 ऑगस्ट 2023 रोजी परळी शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व  शांतीलाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.       याप्रसंगी श्री. विकासराव डुबे, श्री.डॉ.सतीश रायते, श्री. राजेश्वर देशमुख, श्री. जीवनराव गडगूळ, श्री. गिरीश ठाकूर सर (प्राचार्य, सीबीएसई) श्री. एन. एस. राव सर (प्राचार्य, स्टेट) इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.           याप्रसंगी सर्वप्रथम संकुलातील श्री. राहुल सूर्यवंशी आणि त्यांचा समूह यांनी "जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले" हे समूहगीत सादर केले. त्यानंतर *एमकेसी* मधील चिमुकल्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली, ती उपस्थित सर्वांना

स्वातंत्र्य दिन : चिरायू होवो

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी(प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे ओेैचित्य साधुन दरवर्षी प्रमाणे प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याची ७७ वर्षे साजरी करताना विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण समारंभात मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात भाग घेतला.  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परळी शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डाॅ. विजय रांदड , सलिम चाउस पोलीस निरीक्षक, परळी शहर यांची उपस्थिती  लाभली.  ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम,देशभक्तीपर गीतांचे पठण, सामुहिक नृत्य रंगमंचावर सादर केले.  प्रशालेमध्ये भारताचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य दर्शविण्यासाठी वैयक्तिक देशभक्तीपर गीत गायन,फॅन्सी ड्रेस, राष्ट्रध्वज बनवणे, चित्रकला  अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रशालेचे प्राचार्य श्री. विठ्ठल तुपे व  मान्यवरांच्या  हस्ते पारितोषिके देण्यात आली. या  कार्यक्रमासाठी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरण गित्ते ,  प्रशालेचे प्रेरणास्थान  मार्गदर्शक

स्वातंत्र्य दिन : चिरायू होवो

इमेज
  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 76 वा स्वातंत्र्य  दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.  15 ऑगस्ट  2023  भारत देशाच्या 76 वा स्वातंत्र्य दिन  देशभर मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 8 :10  वाजता राष्ट्रपती महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून 76 वा स्वातंत्र्य दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्रा.ए. ए.मुंडे मॅडम, प्रा.यु.एन.फड, प्रा.एस.आर.कापसे, प्रा.व्ही एन.शिंदे, प्रा.ए.डी. शेख. प्रा.पी.पी. परळीकर, ए. डी.अघाव, एस. बी.आष्टेकर, व्ही एन.शिंदे, जी.व्ही. कांबळे, यु.बी.जगताप, एम.पी.सातपुते, एन.व्ही. दळवी यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  श्रीमती सुशिलाबाई कुकडे यांचे वृद्धापकाळाने निधन परळी वैजनाथ/ प्रतिनिधी वैजनाथ गल्ली परळी येथील रहिवाशी श्रीमती सुशिलाबाई बाबुराव कुकडे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या 82 वर्ष वयाच्या होत्या. श्रीमती सुशिलाबाई बाबुराव कुकडे रा वैद्यनाथ गल्ली यांचे सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आली. श्रीमती सुशिलाबाई कुकडे या अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने सर्व परिचित होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमात त्या सहभागी होत असत. सतीश व पुरुषोत्तम कुकडे यांच्या त्या मातोश्री होत. शिवसेनेचे नेते संजय कुकडे, प्रवीण कुकडे यांच्या त्या काकू होत. कुकडे परिवाराच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

सन्मान कर्त्वाचा : विशेष कार्यगैराव पुरस्कार

इमेज
वै.प्रा.हरिश्चंद्र पंडीतराव गित्ते सर यांचा बारावा पुण्यस्मरण सोहळा  सन्मान कर्त्वाचा :  विशेष कार्यगैराव पुरस्कारासह गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार       परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वै.प्रा.हरिश्चंद्र पंडीतराव गित्ते सर यांच्या बाराव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वा. राज्याच्या माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून, बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमास त्रिपुरा राज्याचे सचिव किरणकुमार गित्ते, उपजिल्हाधिकारी जिवराजजी डापकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर  ह.भ.प.श्री.केशव महाराज उखळीकर, ह.भ.प.श्री.अर्जुन महाराज लाड गुरूजी, ह.भ.प.श्री.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प.श्री.प्रभाकर महाराज (नाना) झोलकर, ह.भ.प.श्री.गोविंद महाराज मुंडे, ह.भ.प.श्री.सचिन महाराज गित्ते, ह.भ.प.श्री.जगदीश महाराज सोनवणे आदी मान्यवरांची या वेळेस प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या

चित्रपट समिक्षा : #जोशींचीतासिका ✍️ अनिरुद्ध जोशी●नक्की का पहावा OMG2?

इमेज
  नक्की का पहावा OMG2? # जोशींचीतासिका 11 ऑगस्ट रोजी प्रामुख्याने तीन चित्रपट प्रदर्शित झाले एक थलाईवा रजनीकांत, सनी देओलचा बहुप्रतिक्षित गदर2 आणि अक्षय कुमारचा OMG2. ह्या तिन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाकडून मनोरंजनासोबत प्रबोधन वगैरेची सहसा कोणी अपेक्षा ठेऊ शकत नाही. पण, यंदा अक्षय कुमारच्या चित्रपटाने सुखद धक्का दिला आहे. तीनपैकी गदर2 आणि OMG2 चित्रपट बघण्यात आले. गदर हा टिपिकल सनी देओलच्या पठडीतील चित्रपट आहे हे सांगायला कोण्या समीक्षक वैगरेची कोणालाही गरज नाही. OMG2 मध्ये मोठे नावं म्हणून अक्षय कुमार असले तरी सगळा चित्रपट फिरतो तो पंकज त्रिपाठी भोवती. 'लैंगिक शिक्षण' सारखा नाजूक विषय लेखक व दिग्दर्शक म्हणून अमित रायने ज्या खुबीने हाताळला आहे ते बघून नक्कीच तो अभिनंदनास पात्र आहे. OMG1 & OMG2 यांची तुलना करून मनात कोणतेही पूर्वग्रह ठेवून हा चित्रपट बघू नये असे किमान मला तरी वाटते. चित्रपटात प्रत्येक व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने वावरते ते बघून मजा येते. हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा. गेल्या चार दिवसांत जेलरने सुमारे 300 कोटींचा गल्ला जमवला आहे तर गदर2 135 को

संविधान समता दिंडीचे संचालक ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची माहिती

इमेज
  राष्ट्रचेतना अभियानाची स्वातंत्र्यदिनी मुंबईत सांगता जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी.पारिख,जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, नरेंद्र वाबळे, यांची उपस्थिती मुंबई (प्रतिनिधी) : भारतातीय संविधान,  राष्ट्रध्वज,  राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतिकांचा इतिहास आणि महत्त्व समाजात रुजविण्यासाठी विवेकी वारकरी संघटनांनी पंढरपूर येथून सुरू केलेल्या संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्रचेतना अभियानाचा सांगता सोहळा मंगळवार, दि. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी मुंबईत होत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात होणा-या या सांगता सोहळ्याला ज्येष्ठ  स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी.पारिख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शरद कदम  उपस्थितीत राहणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या त्यागातून स्वतंत्र झालेल्या देशाने अत्यल्प काळात आपले संविधान तयार केले. राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा झेंडा स्विकारला, राष्ट्रगीत म्हणून जन गण मन हे गीत स्वीकारले, इतर काही  राष्ट्रीय प्रतिके स्विकारली. मात्र ज्या शक्तींचा स्वातंत्र्य संग्रामात आणि या प्रतिक

महिला महाविद्यालयात पालक मेळावा

इमेज
  विद्यार्थ्यांनी न घाबरता प्रतिकारशक्तीचा वापर करावा - पोलीस निरीक्षक सलिम चाऊस महिला महाविद्यालयात पालक मेळावा  परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)          विद्यार्थ्यांनी न घाबरता आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे व आपल्या पालकांना मान खाली घालावी लागेल असे वागता कामा नये असे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी केले. येथील कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयांत आज अतिशय सौजन्यपूर्ण वातावरणात पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक चाऊस बोलत होते.            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन शनिवारी (ता.१२) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती व संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. महिला महाविद्यालय हे विद्यार्थिनींच्या हितासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थिनींना व पालकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी व सकारात्मक  विचार विमर्श करण्यासाठी म्हणून महाविद्यालयात या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

गोळीबार:तीन आरोपींना अटक

इमेज
  परळी- अंबाजोगाई रस्त्यावरील गोळीबार : परभणीच्या तीन आरोपींना अटक परळी वैजनाथ: परळी- अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी शिवारात एका हॉटेलमध्ये सिगारेटचे पैसे मागितल्याने चौघांनी गोळीबार केला होता. ही घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी तिघांना परभणी येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.         परळी- अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी जवळील हॉटेल यशराजमध्ये सिगारेट घेण्यासाठी रात्री ११ वाजेच्या सुमारास लातूरहून अंबाजोगाईमार्गे परळी परभणीकडे एका गाडीतून निघालेले चौघे जण थांबले. हॉटेल मॅनेजरला सिगारेटचे पॉकेट मागितले. पॉकेट दिल्यावर त्याने १५० रुपये मागितले. यावर मॅनेजर नरेश निशाद यास मारहाण करत तीन गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने यात मॅनेजर बालंबाल बचावला होता. याप्रकरणी चार अनोळखींविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी पोलीसांकडून बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.तसेच सीसीटिव्हीत हा प्रकार कैद झाला होता.   पोलिसांनी आरोपी ज्या गाडीने आले होते, त्या गाडीचा शोध घेतला. ही गाडी परभणी येथील असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी परभणी गाठली. या सर्व मार्गाने पोलीसांकडून शोघ घेण्यात आला

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

इमेज
  खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडला: सपोनि सपकाळ यांची कामगिरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे  सपोनि सपकाळ यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना या आरोपीला दादर पोलीसांच्या सहकार्याने पकडण्याची कामगिरी बजावली आहे.         परळी शहर पोलीस ठाण्यात  कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2023 कलम 302, 34 आय.पी.सी. अन्वये गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे  सपोनि सपकाळ करत आहेत. तांत्रिक तपासा दरम्यान पाहिजे असलेला आरोपी याचे दादर परिसरामध्ये लोकेशन दिसून येत होते. एपीआय सपकाळ यांना दि.१३ रोजी 11.45 वाजता एन. सी. केळकर रोडवर हनुमान मंदिर जवळ पाहिजे आरोपीत हा त्याच्या एका मित्रासोबत अचानक दिसून आला. तसेच ते दोघे सदर ठिकाणाहून निघून जाण्याच्या तयारीत दिसून आले. एपीआय सपकाळ हे सिव्हिल ड्रेसवर एकटेच असल्याने व  वेळ कमी असल्याने त्यांनी तात्काळ  कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे कर्तव्यावरील पोलीस हवालदार 970116/सुरेश भोसल

ज्युनियर आय.ए.एस. कॉम्पिटीशन

इमेज
  शेख सालिक रिजवान हुसेन बनला ज्युनियर आय.ए.एस. अंबाजोगाई, योगेश्वरी नूतन विद्यालय,मधील विद्यार्थी शेख सालिक रिजवान हुसेन हा इयत्ता दुसरी मध्ये ज्युनियर आय.ए.एस. बनला.        राज्यस्तरावर आयोजित केलेल्या ज्युनियर आय.ए.एस. स्पर्धेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्याचा सत्कार आज योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत, योगेश्वरी नूतन विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्ता यादीत आल्यामुळे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस.टी. खुरसाळे साहेबांच्या हस्ते सालिक ला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख इस्माईल यांचा नातू असलेला शेख सालिक रिजवान हुसेन याने इयत्ता पहिली मध्येही एम.टी.एस. परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवुन सुवर्ण पदक पटकावले होते.      या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. टी.खुरसाळे , सचिव जी.बी.व्यास , सहसचिव गोस्वामी मॅडम, योगेश्वरी नूतन शाळा प्रशांत नगर चे मुख्याध्यापक के.बी.नांदगावकर सर, मेडिकल शाखेचे विभ

शोध घेण्यास स्थानिक भोई बांधवांच्या टिमला यश

इमेज
36 तासानंतर पाण्यात बुडालेल्या 'त्या' भाविकाचा मृतदेह सापडला शोध घेण्यास स्थानिक भोई बांधवांच्या टिमला यश माजलगाव - तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे शुक्रवार रोजी सकाळी ९ च्या दरम्यान एका भाविकाचा गोदावरी नदीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेला होता यात तो बुडाला असल्याची माहिती त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी दिली होती. या भाविकाचा स्थानिक भोई व बीड, माजलगाव , जालना एनडईआरएफ ची टीम शोध घेत होती. त्या भाविकाचा शोध शनिवार रोजी स्थानिक भोई लोंकाच्या  टिमला सायंकाळी ८ च्या दरम्यान शोध लागला.  तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे अधिक मास असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. या ठिकाणी भारतभरातून भाविक दररोज लाखाच्यावर येत होते यात शुक्रवार रोजी मारोती खवल वय ४५ वर्षे रा.पाटोदा या.परतुर जिल्हा जालणा येथील  भाविक पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते ते दर्शनापूर्वी गोदावरी नदीत अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले होते त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक भोई व बीड,माजलगाव ,जालना येथील एनडईआरएफ टीमल शोध घेत होती त्या भाविकाचा ३६ तासानंतर शनि

मेरी मिट्टी -मेरा देश अभियान.....

इमेज
  वैद्यनाथ कॉलेज येथे एनएसएस वतीने माझी माती, माझा देश -पंचप्रण प्रतिज्ञा  परळी - वै: दिनांक १२   येथील वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा आयोजित करण्यात आली होती मेरी माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . रमेश राठोड होतो . पंचप्रण शपथ देते वेळी प्राचार्य डॉ . राठोड म्हणाले पंचप्रण  हे सर्वांसाठी  असून विकसित भारत, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताची एकात्मता व परकीय शक्ती  व भेद- विषमता निर्माण शक्ती  पासून संरक्षण करण्याची शपथ सर्वांनी घेऊन त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आपल्या राष्ट्राचा विकासाचा ध्यास असणे हे प्रत्येक भारतीय विदर्थ्याचे व नागरिकांचे काम आहे.   प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनचे प्रा . माधव रोडे, क्रिडा विभागाचे प्रा . डॉ . पी . एल . कराड , प्रा . डॉ . भिमानंद गजभारे, प्रा . डी . के . आंधळे, प्रा .डॉ . बी.व्ही. केंद्रे, प्रा . उत्तम कांदे, प्रा . गणेश चव्हाण,  प्रा . हरिश मुंडे , प्रा . सोमनाथ किरवले, प्रा . प्रमोद गी

आदर्शवत कार्य:अनुकरणीय उपक्रम

इमेज
  शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरी केली पुण्यतिथी कै एकनाथ हरिभाऊ कुरवाडे गुरुजींनी आपल्या हयातीत आदर्शवत कार्य केले आणि मृत्यूनंतरही त्यांच्या इच्छेनुसार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, हा कुरवाडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजगुरू यांनी सांगितले. *कै एकनाथ हरिभाऊ कुरवाडे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळी, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा पिंगळी, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पिंगळी आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंगळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.*   या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंगळी गावचे सरपंच श्री अंगदराव अंबादास गरुड, प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजगुरू, केंद्रप्रमुख जल्हारे सर, केंद्रीय कन्या शाळा पिंगळी चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सुभाष शिंदे सर ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजाननराव गरुड आणि सौ मुक्ताताई गरुड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत धबाले, शिक्षण प्रेमी नागरिक श्री रामजी गरु