इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

स्वातंत्र्य दिन

 परचुंडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा





परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 

परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सरपंच सौ. मीना गुरुलिंगआप्पा नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक श्री दशरथ गोरे,उपसरपंच बाळासाहेब थोरात ,मा. उपसरपंच वैजेनाथ पत्रवाळे मुख्याध्यापक  लक्ष्मण आजले सर ,शिक्षक श्री निलेवार सचिन सर व ग्रा. प. सदस्य ओम पत्रवाळे, माऊली नावंदे, फोटोग्राफर गणेश पत्रावळे  यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जि प प्रा शा परचुंडी शाळेमध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ, बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा तसेच निपुण भारत प्रतिज्ञा आझादी का अमृत महोत्सव व विविध विद्यार्थ्यांनी भाषण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गावातील महिला तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!