इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

ध्वजारोहण

 नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.  

      शहरातील नगर परिषद कार्यालय येथे "भारतीय स्वातंत्र्य दिन " सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी  मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांच्या शुभहस्ते पवित्र अशा तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदचे मुख्यधिकारी त्रिबक कांबळे यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याकार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी,  दतात्रय ढवळे, राजेंद्र सोनी, वैजनाथ बागवाले, रविमूळे, बद्दरभाई, सौ. अन्नपूर्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. नगर परिषदेचे  कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे सह नगर परिषदचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या