इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मेरी मिट्टी -मेरा देश अभियान.....

 वैद्यनाथ कॉलेज येथे एनएसएस वतीने माझी माती, माझा देश -पंचप्रण प्रतिज्ञा 




परळी - वै: दिनांक १२   येथील वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा आयोजित करण्यात आली होती मेरी माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . रमेश राठोड होतो . पंचप्रण शपथ देते वेळी प्राचार्य डॉ . राठोड म्हणाले पंचप्रण  हे सर्वांसाठी  असून विकसित भारत, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताची एकात्मता व परकीय शक्ती  व भेद- विषमता निर्माण शक्ती  पासून संरक्षण करण्याची शपथ सर्वांनी घेऊन त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आपल्या राष्ट्राचा विकासाचा ध्यास असणे हे प्रत्येक भारतीय विदर्थ्याचे व नागरिकांचे काम आहे.   प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनचे प्रा . माधव रोडे, क्रिडा विभागाचे प्रा . डॉ . पी . एल . कराड , प्रा . डॉ . भिमानंद गजभारे, प्रा . डी . के . आंधळे, प्रा .डॉ . बी.व्ही. केंद्रे, प्रा . उत्तम कांदे, प्रा . गणेश चव्हाण,  प्रा . हरिश मुंडे , प्रा . सोमनाथ किरवले, प्रा . प्रमोद गीत्ते उपस्थीतीत  होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा . डॉ . माधव रोडे यांनी केले  यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!