मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

स्वातंत्र्य दिन उत्साहात

 विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा




ग्रामपंचायत कासारवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.


सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कासारवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे तसेच उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी घेतली. बालविवाहास कोणीही प्रोत्साहन देणार नाही अथवा मदत करणार नाही असे गावकऱ्यांनी आश्वासन दिले. 


त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विविध महात्म्यांची तसेच स्वातंत्र्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमिका घेणारे विद्यार्थी शोभून दिसत होते. ढोल, ताशा, हलगी यांच्या गजरामध्ये विद्यार्थी बालविवाहाच्या आणि भारत मातेच्या घोषणा देत होते. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांचाही मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ असणे हे फारच कमी गावात असते कासारवाडीत मात्र देशभक्ती जणू प्रत्येक ग्रामस्थाच्या रक्तातच आहे. ध्वजारोहणास आणि प्रभात फेरी त्यामुळेच मोठी शोभा येते. 

प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाचा सन्मान तसेच पोलीस खात्यात सेवा करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. ग्रामसेवक श्री नागरगोजे यांनी मेरी माटी मेरी देश या कार्यक्रमाची माहिती देऊन प्रत्येक गावातून कलशाद्वारे राजधानी दिल्ली येथे माती दिली जाणार असल्याचे सांगितले व गावकऱ्यांनी प्रेमभावे कलशात माती भरण्याचे आवाहन केले त्यानुसार ग्रामस्थांनी कलशात माती भरली व राष्ट्रभावना व्यक्त केली. 

इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये वक्तृत्व करून गावकऱ्यांची मने जिंकली. राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन तसेच राष्ट्रभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य केले. 

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनेक शेरोशायरींची उत्कृष्टपणे गुंफण करत बहारदारपणे श्रीमती प्रिया काळे यांनी केले. संचलनाबद्दल त्यांचा तसेच नवीन शिक्षक श्री स्वामी व श्री मुंडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना खाऊ वाटप करण्यात आला. 

गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री नागरगोजे, पोलीस पाटील श्री बाबुराव गुट्टे यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री राठोड यांच्यासह शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....