शोध घेण्यास स्थानिक भोई बांधवांच्या टिमला यश

36 तासानंतर पाण्यात बुडालेल्या 'त्या' भाविकाचा मृतदेह सापडला


शोध घेण्यास स्थानिक भोई बांधवांच्या टिमला यश

माजलगाव - तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे शुक्रवार रोजी सकाळी ९ च्या दरम्यान एका भाविकाचा गोदावरी नदीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेला होता यात तो बुडाला असल्याची माहिती त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी दिली होती. या भाविकाचा स्थानिक भोई व बीड, माजलगाव , जालना एनडईआरएफ ची टीम शोध घेत होती. त्या भाविकाचा शोध शनिवार रोजी स्थानिक भोई लोंकाच्या  टिमला सायंकाळी ८ च्या दरम्यान शोध लागला. 


तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे अधिक मास असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. या ठिकाणी भारतभरातून भाविक दररोज लाखाच्यावर येत होते यात शुक्रवार रोजी मारोती खवल वय ४५ वर्षे रा.पाटोदा या.परतुर जिल्हा जालणा येथील  भाविक पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते ते दर्शनापूर्वी गोदावरी नदीत अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले होते त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक भोई व बीड,माजलगाव ,जालना येथील एनडईआरएफ टीमल शोध घेत होती त्या भाविकाचा ३६ तासानंतर शनिवार रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान शोध लागला आसल्याची माहिती तहसीलदार वर्षा मनाळे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !