इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 जि प प्रा शा संगम येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा






परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 

परळी तालुक्यातील मौजे संगम येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापक अशोक नावंदे सर  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अच्युतराव चव्हाण गोरे,उपसरपंच कामाळे ,सर्व सदस्य ग्रा पं संगम,शा व्य समिती अध्यक्ष नवनाथराव नागरगोजे, शिक्षक श्री महादेव गित्ते सर ,सुभाष कोंकेवाड सर,श्रीम. कल्पना बडे मॅडम, श्रीम. बबिता शिंदे मॅडम,श्री ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जि प प्रा शा संगम शाळेमध्ये मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ, बालविवाह प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा तसेच निपुण भारत प्रतिज्ञा आझादी का अमृत महोत्सव व विविध विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य या विषयावर आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली शोभा वाढवली.यावेळी श्री प्रमोद(लक्की ) नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीची वाटप करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!