इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

 ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचे हस्ते किनगावकर झाली राधाकृष्ण' मुर्तीची प्राणप्रतिष्ठा



 


किनगाव (प्रतिनिधी)   संतवाङ्मयाचे संशोधक तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या पवित्र हस्ते 'श्रीराधाकृष्ण'मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा  दिनांक १५आँगस्ट रोजी संपन्न झाला.

             या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री बाबासाहेब पाटील, तर प्रमुख पाहुणे विनायकराव पाटील माजी मंत्री . श्री.प्रविण फुलारी साहेब उपजिल्हाधिकारी अहमदपूर,श्री बब्रुवानजी खंदाडे माजी आमदार, डॉ.हरिश्चंद्र वंगे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक, डॉ.दे.घ.मुंडे विचारवंत,सौ.स्मिता देशमुख गीतावाचक, डॉ.अमोल पागे कृष्णभक्त, तुकाराम फड महाराज हिंगणगाव,ॲड. अनिलराव नवटके अध्यक्ष वकील संघ अहमदपूर,डॉ.दे.घ.मुंडे विचारवंत आदिंच्या उपस्थित हा भव्यदिव्य सोहळा पार पडला.

यावेळी सामुदायिक गीतापाठ व सुप्रसिद्ध गायिका गानकोकिळा गोदावरीताई मुंडे यांचे गायनाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कार्यक्रमाचे  संयोजक ॲड. सुनील रामराव केंद्रे, श्री अनिल केंद्रे,श्री किशोर केंद्रे (माजी नगरसेवक परळी), श्री गणेश केंद्रे,तसेच श्री बबलु  रोडगे, श्री जितेंद्र बदने,ॲड भास्कर मुंडे, डॉ.जनार्दन बदने, अभिषेक बदने, सत्यजित बदने, विष्णू केंद्रे,ॲड सुदर्शन मुंडे, दिलदारभाई शेख (सामाजिक कार्यकर्ते),अफजल मोमीन पत्रकार,विद्यावान वाघमारे,सय्यद शादुल,ज्ञानोबा देवदे,व्यंकट मुंडकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!