आदर्शवत कार्य:अनुकरणीय उपक्रम

 शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरी केली पुण्यतिथी

कै एकनाथ हरिभाऊ कुरवाडे गुरुजींनी आपल्या हयातीत आदर्शवत कार्य केले आणि मृत्यूनंतरही त्यांच्या इच्छेनुसार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, हा कुरवाडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजगुरू यांनी सांगितले.


*कै एकनाथ हरिभाऊ कुरवाडे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळी, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा पिंगळी, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पिंगळी आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंगळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.*  


या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंगळी गावचे सरपंच श्री अंगदराव अंबादास गरुड, प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजगुरू, केंद्रप्रमुख जल्हारे सर, केंद्रीय कन्या शाळा पिंगळी चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सुभाष शिंदे सर ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजाननराव गरुड आणि सौ मुक्ताताई गरुड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत धबाले, शिक्षण प्रेमी नागरिक श्री रामजी गरुड, गजाननराव गरुड, दत्तराव गरुड, गजानन दामोधर ,पिंपरी शाळेचे मुख्याध्यापक श्री देशपांडे सर, प्राथमिक शाळा उर्दूचे मुख्याध्यापक खमरूद्दीन सर,  शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री गजानन गरुड, श्री वैजनाथ कुरवाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै एकनाथ कुरवाडे गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व अतिथीच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विलास कुरवाडे यांनी केले. आपल्या बाबांच्या आठवणी त्यांची कन्या सौ. सुजाता फुटके यांनी सांगितल्या. 

श्री राजगुरू यांनी कुरवाडे गुरुजी यांची बद्दलची माहिती सांगून विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांची सेवा करणे म्हणजे परमेश्वराची सेवा करणे आहे असा संदेश दिला. 

कन्या प्रशाला पिंगळीचे मुख्याध्यापक श्री शिंदे यांनी जीवनात संगत आणि संस्कार अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी योग्य संगत धरावी आणि आपल्या आई वडिलांचे संस्कार विसरू नयेत असा संदेश दिला. 


शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर कार्यक्रमाचे आभार श्री कावळे सर यांनी मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुरवाडे परिवारातील श्री विनोद कुरवाडे, सौ दिपाली कुरवाडे, सौ रुपाली कुरवाडे, कु साक्षी कुरवाडे, चि वरद आणि वेदांत कुरवाडे त्याचबरोबर पिंगळी शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार