इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राचार्य ,डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे प्रकाशन



 परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाची प्राचार्य, डॉ.आर डी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पासून या दिवसाला  ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारताला मुक्त करण्यासाठी आनेक शूरवीरांनी प्राणाची आहुती दिली व भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. तेव्हा पासून आपण हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत आहोत. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन.सी.सी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव आप्पा मुंडे, उपाध्यक्ष टी.पी .मुंडे, संस्थेचे सचिव दत्ताप्पा इटके यांच्यासह इतर संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयन कुमार आचार्य यांनी केले.तसेच रसायनशास्त्र विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सचिव शदत्ताप्पा ईटके, प्रमुख उपस्थिती काटकर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. एम . एन. रोडे, संयोजक डॉ एम.जी.लांडगे,  डॉ. विरश्री आर्या,  गया नागोराव यांची उपस्थिती होती. सदरील भित्तिपत्रकासाठी बी एससी, बी ए,  व बी.कॉम च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थी व समाज जागृतीसाठी नवीन शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एका संघाने भित्तिपत्रक तयार केले होते तर दुसऱ्या संघाने मणिपूर न्यूज या विषयावर भित्तिपत्रक तयार केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख काटकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव  दत्तापा इटके यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबाबत आजचा विद्यार्थी जागरूक असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थी आणि समाज अशा प्रकारे जागरूक झाला तर भारत नक्कीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास यशस्वीपणे सामोरे जाईल यात शंका नाही असे ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त आयोजित भित्तीपत्रकासाठी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संयोजक डॉ एम.जी. लांडगे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!