महिला महाविद्यालयात पालक मेळावा

 विद्यार्थ्यांनी न घाबरता प्रतिकारशक्तीचा वापर करावा - पोलीस निरीक्षक सलिम चाऊस



महिला महाविद्यालयात पालक मेळावा 


परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)

         विद्यार्थ्यांनी न घाबरता आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे व आपल्या पालकांना मान खाली घालावी लागेल असे वागता कामा नये असे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी केले.

येथील कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयांत आज अतिशय सौजन्यपूर्ण वातावरणात पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक चाऊस बोलत होते.

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन शनिवारी (ता.१२) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती व संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. महिला महाविद्यालय हे विद्यार्थिनींच्या हितासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थिनींना व पालकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी व सकारात्मक  विचार विमर्श करण्यासाठी म्हणून महाविद्यालयात या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संजय देशमुख हे लाभले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, प्रमुख पाहुणे संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. व्ही.व्ही. देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक श्री.फडतरे आदि मान्यवर उपस्थित होते.  स्वागत समारंभानंतर आपल्या प्रास्ताविकपर वक्तव्यात प्रा. प्रवीण फुटके यांनी विद्यार्थिनींच्या साठी महाविद्यालयाने केलेल्या विविध प्रयत्नांचा व विद्यार्थिनींच्या विविध क्षेत्रातील गुणगौरवाचा आढावा घेतला .

समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ पी. व्ही .गुट्टे यांनी वरिष्ठ विभागाच्या वतीने प्रस्ताविक केले .त्यांत त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थीनींची उपस्थिती वाढवण्यासाठी पालकांशी  संवाद घडणे आवश्यक असते. पालक - शिक्षक - प्राचार्य - विद्यार्थी यांचा संवाद होणे हे अत्यन्त महत्वाचे आहे. इत्यादी विचार मांडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयात विद्यार्थिनीच्या उन्नतीसाठी होत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती  दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना सलिम चाऊस म्हणाले की , मुलींनी न घाबरता  प्रथम त्यांच्या प्रतिकारशक्तीचा वापर करून त्यांना त्रास देणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे. कुणी तुम्हाला त्रास देत असेल तर ११२  नंबर डायल करा आम्ही पाच मिनिटात उपस्थित राहू असा विश्वासही त्यांनी मुलींना दिला.अभ्यास करा. वाकडं पाऊल पडू देऊ नका. वडिलांची मान कधीही खाली जाऊ देऊ नका अशा मोलाच्या सल्ल्यासोबतच विद्यार्थिनींना उपयोगी असे अनेक महत्वाचे विचार त्यांनी मांडले. यानंतर पालकांनी ज्या कांही समस्या सांगितल्या त्या समस्यांचेही निराकरण करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी म्हटले की, पालकांनी मुलींना स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन कामं मुलींनाच करु द्या. मुलींच्या शिक्षणासाठी जागरूक रहा. मुलींच्या करिअरसाठी  आम्ही केलेल्या प्रयत्नांनी आपण निश्चितच समाधानी असाल. इत्यादी विचार त्यांनी मांडले. प्रास्ताविक श्री प्रवीण फुटके यांनी सूत्रसंचालन प्रा नव्हाडे यांनी तर प्रा डॉ. चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थिनी वृन्द , महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?