इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

ज्युनियर आय.ए.एस. कॉम्पिटीशन

 शेख सालिक रिजवान हुसेन बनला ज्युनियर आय.ए.एस.




अंबाजोगाई, योगेश्वरी नूतन विद्यालय,मधील विद्यार्थी शेख सालिक रिजवान हुसेन हा इयत्ता दुसरी मध्ये ज्युनियर आय.ए.एस. बनला.

       राज्यस्तरावर आयोजित केलेल्या ज्युनियर आय.ए.एस. स्पर्धेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्याचा सत्कार आज योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत, योगेश्वरी नूतन विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्ता यादीत आल्यामुळे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस.टी. खुरसाळे साहेबांच्या हस्ते सालिक ला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख इस्माईल यांचा नातू असलेला शेख सालिक रिजवान हुसेन याने इयत्ता पहिली मध्येही एम.टी.एस. परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवुन सुवर्ण पदक पटकावले होते.

     या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. टी.खुरसाळे , सचिव जी.बी.व्यास , सहसचिव गोस्वामी मॅडम, योगेश्वरी नूतन शाळा प्रशांत नगर चे मुख्याध्यापक के.बी.नांदगावकर सर, मेडिकल शाखेचे विभाग प्रमुख एस.जी.वैद्य सर, पल्लवी गंगणे मॅडम, ढगे मॅडम, जोशी मॅडम, सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षण प्रेमी नागरिक बहु संख्येने उपस्थित होते. सालिक च्या या यशात त्याला शिवहार ढगे सर, पल्लवी गंगणे मॅडम, आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तो सांगतो. भविष्यात क्लास वन अधिकारी बनुन देश सेवा करणार असल्याचे मनोगत याप्रसंगी शेख सालिक रिजवान हुसेन ने व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर सरांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या