हुतात्मा स्मारक कोनशिलेचे भूमिपूजन

 प्रा.डॉ.बळीराम पांडे यांचा तिरुका ग्रामस्थानी केला सन्मान



मराठवाडा (प्रतिनिधी...)तिरुका येथील  भूमिपुत्र तथा देवगिरी महाविद्यालयातील  अर्थशास्त्र विभागाचे  अभ्यासु प्राध्यापक  डॉ. बळीराम पांडे यांचा सन्मान तिरूका ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.             

       प्रा.डॉ.बळीराम पांडे यांना ध्वजारोहण करण्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते.याप्रसंगी डॉ.पांडे यांना मायेची, विश्वासाची शाल पांघरण्यात आली. अन् कित्येक वर्षाच्या त्यांच्या हरवलेल्या आनंदाश्रूंना त्यांना आवरता आले नाही.आत्यंतिक भावस्पर्शी असा हा कार्यक्रम संपन्न झाला.स्वातंत्र्य सेनानी संग्राम आत्माराम पांडे यांचा कर्तृत्ववान, समाजशील नातू म्हणून हा सन्मान त्यांना देण्यात आला.यावेळी स्वातंत्र्य सेनानी संग्राम आत्माराम  पांडे आणि त्यांचे स्वातंत्र्य संग्रामातील  सहकारी यांच्या स्मृती जपण्यासाठी तिरुका ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारक कोनशीलेचे भूमिपूजनही प्रा.डॉ.बळीराम पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने प्रा.पांडे यांनी त्यांच्या जीवनप्रवासातील कटूगोड आठवणींना उजाळा दिला.त्यांच्या गावाला व कुटुंबाला बलिदान व समर्पणाची तशी फार मोठी परंपरा आहे.त्याच परंपरेतून पुढे लढण्यासाठी मला लक्षणीय बळ मिळाल्याचे ते या प्रसंगी म्हणाले.पुढे बोलतांना प्रा.पांडे म्हणाले की,

खरोखरच किती अगम्य, अविस्मरनीय,गूढ होते ते जीवन. सन्मान तसे अनेक होत राहतात पण आपल्या जन्मभूमीत,आपल्याच गावात, आपल्याच जिवाभावाच्या माणसांनी दिलेला सन्मान आणि त्यात डॉ.बळीराम पांडे  यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती वेगळाच आनंद देऊन गेला. माझ्या आयुष्याला आकार देणारे  आजपर्यंतचे सर्व गुरुजन  माझ्या नजरेसमोरून तरळून गेले.  त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाने आणि अनेक जिवाभावाच्या जिवलगांनी मला केलेले सहकार्य आणि त्याबरोबर मी उपसलेले कष्ट हे सारं सारं एका क्षणात माझ्या मन:चक्षुसमोर उभं राहत गेलं.त्यामुळेच मी आज समर्थ पध्द्तीने उभा आहे म्हणून या सर्वांविषयीची मी कृतज्ञता व्यक्त करतो.समस्त गावकऱ्यांचे मी आभार मानतो. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात माझे आजोबा संग्राम आत्माराम पांडे व माझ्या गावातील ज्या शूरविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांना  विनम्र अभिवादन करतो.असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.


 याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा गावचे उपसरपंच श्री. मारुती पांडे चेअरमन श्री. रतन पाटील, सरपंच सौ. खटके ताई,व्हाईस चेअरमन श्री. श्रीकृष्ण पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.गंगाधर गुरुजी,माजी सरपंच श्री.राजू सगर, क्रांती विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री. संपतराव पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.रमाकांत कारभारी, व्यंकटराव खटके, इंजि. सुनील चामवाड ,इतर पदाधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, शाळेचे कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,  इतर मान्यवर तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?