पोस्ट्स

राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने, आरक्षण मिळावे यासाठी सर्व मिळून व्यापक प्रयत्न करू - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडे यांनी परळीतील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने, आरक्षण मिळावे यासाठी सर्व मिळून व्यापक प्रयत्न करू - धनंजय मुंडे जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेत जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणारच - मुंडेंचा आंदोलकांना शब्द परळी वैद्यनाथ (दि. 4) - मागील राज्य सरकारच्या काळात आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात संवैधानिक बाबींमध्ये निर्माण झालेल्या पेचामुळे टिकू शकला नाही, मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच विचारांचे हे सरकार आहे; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून व्यापक प्रयत्न करू, सरकारही सरकारची जबाबदारी 100% पार पाडेल, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवली - सराटी येथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन स्थळी झालेल्या अप्रिय घटनेनंतर परळी वैद्यनाथ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनास आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. जालना ज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

इमेज
  मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे- अभयकुमार ठक्कर परळी / प्रतिनिधी  मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांनी यावेळी आंदोलन कर्ते शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे व राष्ट्रवादी तालुका प्रमुख लुगडे महाराज  यांना जाहीर पाठिंबा दिला असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असेही ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले.       मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी शनिवारी (ता २) बेमुदत ठिय्या सुरुवात झाली आहे. ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता.4) शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभय कुमार ठक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी  आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करीत आहे. त्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीच

पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा गाडीही रद्द

इमेज
  पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा गाडीही रद्द  परळी रेल्वे स्थानकावरून धावणारी महत्वाची रेल्वे गाडी असलेली पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा ही रेल्वेमार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामानिमित्त रद्द करण्यात आलेली आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग अंतर्गत चालणाऱ्या अनेक गाड्या रद्द व अंशतः रद्द करण्यात आलेल्या असून त्यात रेल्वेस महसुली उत्पन्न देणारी पूर्णा-हैदराबाद डेक्कन-पुर्णा हे रेल्वे गाडी काही दिवस रद्द करण्यात आलेली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार पूर्णा- हैदराबाद-पूर्णा एक्स्प्रेस गाडी रोलिंग ब्लॉक कामामुळे काही दिवस रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 17648 पूर्णा – हैदराबाद एक्स्प्रेस दि 05 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर, 2023 तर गाडी क्रमांक 17647 हैदराबाद –  पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 06 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर, 2023   दरम्यान रद्द करण्यात आली  आहे.

जनता जनार्नदाचे हे प्रेम असेच अबाधित राहो हिच इच्छा

इमेज
 श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने प्रचंड उत्साहात सुरू झाली पंकजा मुंडेंची शिव-शक्ती परिक्रमा कार्यकर्त्यांकडून जागोजागी जंगी स्वागत ; आबालवृद्ध, महिला स्वागतासाठी रस्त्यावर; सुवासिनींनी केले औक्षण अन् फुलांचा वर्षाव परिक्रमेला निघतांना  छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबांना केले वंदन जनता जनार्नदाचे हे प्रेम असेच  अबाधित राहो हिच इच्छा छत्रपती संभाजीनगर ।दिनांक ०४।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या शिव-शक्ती परिक्रमेला सुरूवात केली. कार्यकर्त्यांनी  प्रचंड आणि सळसळता उत्साहाने यावेळी त्यांचे जागोजागी जंगी स्वागत केले. आबालवृद्ध, महिला त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरल्या, ठिकठिकाणी फुलांचा वर्षांत करत सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं.      पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा आजपासून सुरू झाली. सकाळी त्यांनी वेरूळ येथे श्री घृष्णेश्वरास विधिवत पूजा, अर्चना करून  दर्शन घेतले. पावसा अभावी महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट
इमेज
साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा आपघाती मृत्यू   बीड- प्रथितयश साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नी दिली आहे. कर्जत येथे नोकरीस असलेले बीड येथील रहिवासी प्रा श्रावण गिरी हे सायंकाळी औरंगाबाद वरून आले होते.कर्जत ला जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते.तेथून ट्रॅव्हल्स ने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना या ट्रॅव्हल्स ने त्यांना धडक दिली,त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी  सोमवारी त्यांच्या मूळगावी लिंबगाव ता. अंबाजोगाई येथे ठीक सकाळी 10 वाजता होईल. 💐💐 *भावपूर्ण श्रद्धांजली*💐💐

'शिव-शक्ती' परिक्रमेची सुरूवात

इमेज
  पंकजा मुंडे यांच्या 'शिव-शक्ती' परिक्रमेची श्री  घृष्णेश्वरच्या दर्शनाने होणार सुरूवात स्वागतासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी ; परिक्रमा १२ जिल्हयात जाणार - टिझर झाला प्रचंड व्हायरल परळी वैजनाथ ।दिनांक ०३।  शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची परिक्रमा उद्यापासून (ता. ४) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू होत आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा  प्रवास परिक्रमेचा असणार आहे.  या परिक्रमेचा  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी होत आहे.   उद्या सोमवारी सकाळी ८ वा. पंकजाताई मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ७ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील पांडूरंग काॅलनी गारखेडा परिसरात संत भगवान बाबा मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील. दरम्यान परिक्रमेचा टिझर आज प्रचंड व्हायरल झाला. पराक्रम खूप केले, आता परिक्रमा करू असं सांगत पंकजाताई मुंडे यांनी शिव आणि शक्तीचं दर्शन घेण्य

'संस्कृत दिन'

इमेज
  वैद्यनाथ महाविद्यालयात 'संस्कृत दिन' साजरा               *परळी वैजनाथ-दि.३*                      सर्व भाषांची जननी व समग्र ज्ञान- विज्ञानाचे आगर म्हणून ओळख असलेल्या संस्कृत या प्राचीन भाषेत वैश्विक कल्याणाचे  विश्वाचे मूलभूत वैभव दडले असून या भाषेच्या अभ्यासाने मानवी जीवन धन्य होते, असे विचार प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आचार्य श्री सानंद यांनी मांडले.         येथील वैद्यनाथ महाविद्यालयात नुकताच *संस्कृत दिन* साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ आर. डी. राठोड यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य एच.डी. मुंडे ,पर्यवेक्षिका प्रा.सौ. मंगला पेकमवार ,समन्वयक प्रा.यु. आर. कांदे उपस्थित होते. याप्रसंगी आचार्य श्री सानंद यांनी संस्कृत भाषेतील चिरंतन गुणवैशिष्ट्यांचा गौरव करून ही भाषा शिकण्यास अतिशय सोपी, सुलभ, शुद्ध, रंजक,गोड, रसपूर्ण व उच्च ज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले- 'प्राचीन ऋषी-मुनी व साहित्यिकांनी  संस्कृत भाषेतून साहित्य सृजन करून आध्यात्मिक व भौतिक प्रगती साधण्याचा मूलमंत्र दिला. आजच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे मूळ देखील संस्कृत भ

श्रावणी वेदज्ञान सप्ताहाची उत्साहात सांगता

इमेज
  श्रावणी वेदज्ञान सप्ताहाची उत्साहात सांगता   "वैदिक विचारांनीच जग सुखी व आनंदी होईल"- प्रसिद्ध विद्वान आचार्य सानंद यांचे प्रतिपादन  *परळी वैजनाथ-दि.३-*                       "आज सर्वत्र अविचारांचे वादळ सुटल्याने मानवी जीवनाची नौका डगमगत आहे. आधुनिक भौतिक विज्ञानाची प्रगती मोठ्या प्रमाणात होत असली तरी त्याला अध्यात्माची जोड नसल्याने सारे जग दुःखाच्या खाईत लोटले जात आहे. अशा या दुरवस्थेत वेदांचे शुद्ध विचार हेच एक मात्र तरणोपाय आहेत. या वैदिक विचारांनीच सारे जग सुखी व आनंदी होईल. म्हणूनच समग्र मानवसमूहाने वेदज्ञानाचा आश्रय घ्यावा", असे  आवाहन पानिपत (हरियाणा ) येथील प्रसिद्ध वैदिक विचारवंत आचार्य सानंद जी यांनी व्यक्त केले.                     येथील आर्य समाजात सुरू असलेल्या श्रावणी वेदज्ञान सप्ताहाची सांगता नुकतीच उत्साहात झाली . या अखंड ज्ञानपर्वाच्या समारोपदिनी आचार्य श्री सानंद जी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे कोषाध्यक्ष श्री उग्रसेन राठौर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वेद अभ्यासक प्रा. सोनेराव आचार्य हे होते. यावेळी तपस्व

पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दिव्य दर्शन

इमेज
  तिरूमला तिरुपतीच्या ट्रस्टीनी घेतलं परळीत प्रभु वैद्यनाथाचे दर्शन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          प्रसिद्ध देवस्थान तिरूमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त श्री कमलेश जी महाराज यांनी आज परळीत येऊन प्रभू वैद्यनाथाचे पूजन करून दर्शन घेतले.           तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त असलेले श्री कमलेश जी महाराज हे एका धर्मसभेच्या निमित्ताने आले होते. या अनुषंगाने त्यांनी परळीत येउन  बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सचिव प्रा बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा वैद्यनाथाची प्रतिमा देऊन ह्रदय  सत्कार केला.  यावेळी त्यांच्या समवेत संत महंतही उपस्थित होते.  आदिनाथ जगनियंता ज्योतिर्लिंग भगवान वैद्यनाथाच्या दर्शनाने अतिव समाधान व प्रसन्नता लाभल्याचे यावेळी श्री कमलेश जी महाराज यांनी सांगितले. . 

2018 मध्ये याच मैदानावर झाले होते तब्बल 21 दिवस आंदोलन

इमेज
  मोठी बातमी- मराठा आंदोलन : परळीत पुन्हा सुरु होणार बेमुदत ठिय्या आंदोलन 2018 मध्ये याच मैदानावर झाले होते तब्बल 21 दिवस आंदोलन परळी वैजनाथ,  वृत्तसेवा....            सध्या महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन, जालना जिल्ह्यात झालेला लाठीचार्ज व त्यानंतर त्याचे उमटलेले पडसाद या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या परळीत पुन्हा एकदा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. आज सायंकाळच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोर शड्डू ठोकत ठिय्या आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. हे आंदोलन बेमुदत असणार असून यापूर्वी परळीत 21 दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन करण्यात आले होते. Click : ■ *मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : सखोल चौकशीची पंकजा मुंडेंची मागणी*        मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने 17 जुलै 2018 पासून तब्बल 21 दिवस मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर परळी येथे आंदोलन झाले होते. या आंदोलनाने संपूर्ण राज्यात खळबळ उडून गेली होती. मराठा आरक्षण आंदोलनातील ऐतिहासिक आंदोलन म्हणून याकडे पाहिले जाते. तब्बल 21 दिवस झा

पंकजा मुंडेंची मागणी

इमेज
  मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : सखोल चौकशीची पंकजा मुंडेंची मागणी मुंबई.... मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.    जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले.  यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले. यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलन स्थळी दाखल होत आहेत.या दरम्यान दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी ६ च्या दरम्यान अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर आश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा  पंकजा मुंडे यांनी निषेध केला आहे.        याबाबत ट्विट करत पंकजा मुंडेंनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते

माकपचाही बंदला पाठिंबा

इमेज
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध : माकप परळी वैजनाथ, जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१) अमानुष लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार केला. पोलिसांच्या या अमानुष कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. देशभरातील सर्व प्रमुख विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रात हजर असताना आंदोलकांवर झालेला हल्ला म्हणजे राज्य सरकार कुणालाच जुमानत नसल्याचे व विरोध करणारांना चिरडून काढणार असल्याचा संदेश देणारे आहे. राज्य सरकारचा हा दृष्टिकोन अत्यंत निषेधार्ह आहे. राज्य सरकारच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निषेध करीत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक व महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार करुन अनेकांना जखमी केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा असल्याची माहिती जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे, ॲड. अजय बुरांडे यांनी दिली आहे.

बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न

इमेज
  मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज ; मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे आमरण उपोषण सुरू. बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न. बीड | प्रतिनिधी.  जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले. या आंदोलनामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले. यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलन स्थळी दाखल होत आहेत.  या दरम्यान दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी ६ च्या दरम्यान अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर आश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक सुरू होती. बैठकीनंतर बीड जिल्हाधिकाऱ्यांना लाठीचार्ज चा निषेध नोंदवत आंदोलनाला पाठिंबा द

मनमोकळ्या गप्पा ; लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक

इमेज
  छत्रपती उदयनराजे भोसले व पंकजा मुंडे यांची मुंबईत कौटुंबिक भेट मनमोकळ्या गप्पा ; लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक मुंबई  । दिनांक ०१। छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची आज निवासस्थानी सदिच्छा भेट झाली. स्नेहभोजन आणि मनमोकळ्या गप्पांसह दोघेही लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणीने भावूक झाले.    छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही भेट कौटुंबिक होती. पंकजाताईंशी छत्रपती उदयनराजे यांचे बहिण-भावाचे नाते आहे.  पंकजाताईंनी यावेळी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर स्नेहभोजन आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या, छत्रपतींनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला, यावेळी ते दोघेही भावूक झाले. "छत्रपती उदयनराजे माझ्यासाठी माझे मोठे बंधू... आज माझ्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले होते. आमच्यात खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या.. मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक झालो...खरे ऋणानुबंध असेच असतात.." अशी प्रतिक्रिया पंकजाताईंनी यावेळी व्यक्त केली. ••••

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण

इमेज
  मानवता धोक्यात; विद्वेषाच्या वणव्यात माणुसकी महत्त्वाची-हभप शामसुंदर सोन्नर महाराज रत्नागिरी-ना हिंदू धर्म धोक्यात, ना मुस्लिम धर्म धोक्यात. धोक्यात आहे ती मानवता. आज जाती धर्मावरून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापुरुषांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. विद्वेषाचा वणवा पेटत असताना संतांनी सांगितलेला समतेचा, माणुसकीचा विचार पसरवण्याची गरज आहे. ही ताकद वक्तृत्वात आहे. कै मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेतून मानवता, समता, बंधुभाव जोपासण्याचे, संविधान वाचवण्याचे वारकरी व्हावे असे आवाहन महाराष्ट्रातील ख्यातनाम  प्रबोधनकार ह. भ. प.शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले.  ते मृणाल हेगशेट्ये स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व  स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल ताई परुळेकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये,  सेक्रेटरी परेश पाडगावकर, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संचालक संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, परीक्षक प्रा. कैलास गांधी, प्रा. अदिती मुळे, दीप्ती कानविंदे, अभिजीत बिरनाळे,श्री.नथुराम देव

नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

इमेज
  नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड यांची माहिती  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी  संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मंगळवार दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी मित्र परिवाराच्या वतिने श्री वैद्यनाथास अभिषेक व विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भक्ताराम फड व मित्र मंडळी यांनी दिली आहे.         कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे हे स्वभावाने स्वच्छ,निर्मळ, अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे दिलखुलास व्यक्तीमत्व,शेती, शिक्षणा बरोबरच सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन चालनारे व प्रत्येकाला आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहेत. शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असतो त्याचबरोबर प्रत्येकास प्रेमाणे वागणुक देत गोरगरिबांना व सर्वसामान्यांना वेळप्रसंगी सहकार्य मदत करणारे आधार

११ सप्टेंबरला परळीत समारोप

इमेज
  पंकजा मुंडे यांची राज्यात ४ सप्टेंबर पासून 'शिव-शक्ती' परिक्रमा १२ जिल्हयातून करणार ४ हजार कि.मी. प्रवास: घृष्णेश्वर दर्शनाने सुरूवात ; ११ सप्टेंबरला  परळीत समारोप   परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा......            श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या येत्या ४ सप्टेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. ४ तारखेला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर पासून या दर्शन दौऱ्याला सुरवात होणार असून समारोप ११ तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत.  प्रवासा दरम्यान ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत.     पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकामातेचे दर्शन घेतले. या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद पहायला मिळाला.  ४ सप्टेंबर रोजी पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू क

कर्तव्यनिष्ठता हेच उज्वल कार्याचे प्रतीक - डॉ. माधव रोडे

इमेज
  कर्तव्यनिष्ठता हेच उज्वल कार्याचे प्रतीक - डॉ. माधव रोडे परळी प्रतिनिधी- वैद्यनाथ कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर श्री. बी.डी. केदारे हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने आज विभागाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख, डॉ माधव रोडे होते, तर प्रमुख म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी.व्हि.केंद्रे होते. सत्कारमूर्ती श्री केदारे यांचा सत्कार डॉ. माधव रोडे,रोडे, डॉ केंद्रे, डॉ गीते आणि डॉ. विनोद  गायकवाड यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ केंद्रे यांनी श्री केदारे यांचा कार्यपरिचय देऊन गौरव उद्गार काढले. कार्यक्रमात डॉ.गीते, डॉ . विनोद गायकवाड,  प्रा वडाळ यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.  अध्यक्ष समारोपात डॉ. माधव रोडे म्हणाले की,  श्री केदारे म्हणजे अल्प व मृदुभाषी,  संयमी, कार्यत्पर व्यक्ती असल्याने ते जीवनात समाधानी आहेत आणि समाधानी व्यक्तीच कर्तव्यनिष्ठ- उज्वल कार्याचे प्रतीक असतो असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.एम.जी.

राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त परळीतील बहीण -भावाचा सत्कार

इमेज
  राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त धनराज पिल्ले यांच्या हस्ते कु.सानवी व चि.सूर्या सौंदळे या बहीण -भावाचा सत्कार     पद्मश्री व राजीव गांधी खेल रत्न तसेच अर्जून पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार श्री.धनराज पिल्ले यांच्या हस्ते थायलंड (पट्टाया) येथील एशियन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियन स्पर्धेतील सहभाग तसेच 16व्या व 17व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धा बेंगलुरू येथे सब ज्युनिअर गटातून अनुक्रमे गोल्ड मेडल व सिल्वहर मेडल प्राप्त केल्याबद्दल कु.सानवी सचिन सौंदळे तसेच 17 व्या बेंगलुरू येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप मधून गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल चि.सूर्या सचिन सौंदळे या सख्या बहीण भावंडाचा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)येथे सत्कार व सन्मान करण्यात आला.   चि.सूर्या व कु.सानवी यांनी जिम्नॅस्टीक खेळात मिळविलेल्या यशाबद्दल भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार श्री.धनराज पिल्ले यांनी अभिनंदन व कौतूक करून क्रिडा क्षेत्रातील दैदीत्यमान यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  चि.सूर्या व कु.सानवी परळीच्या सुपुत्र व सुकन्या असून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठा

शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत

इमेज
  कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या सुचनेचे बीड जिल्हा प्रशासनाकडून तंतोतंत पालन जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25%  अग्रीम पीकविमा मंजूर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढली अधिसूचना सोयाबीन, मूग व उडीद पिकांचा समावेश शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत बीड (दि. 30) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील  दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून, बीड जिल्ह्यातील सर्व 87 महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.  बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळ सदस्य परिस्थिती असल्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करून

भेल स्कुलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा

इमेज
भेल स्कुलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा परळी वैजनाथ :-(दिनांक -30) भेल स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा. सर्वत्र रक्षाबंधन या सणाचा उत्साह असताना भेल स्कूल मध्येही विविध उपक्रम व स्पर्धा घेऊन हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट व पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणून ओळखला जातो. या सणाच्या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. तर बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या उज्वल यशाची कामना व्यक्त करते. राखी पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीमधील अतिशय प्राचीन व वैशिष्टपूर्ण असलेला सण आहे.विदयालयातील विद्यार्थिनींनी प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विदयार्थ्यांना राख्या बांधून औक्षवण केले. यावेळी विद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. आज विद्यालयात राखी बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. झाडांची पाने, फुल, विविध धान्य व पेपर अस्या वस्तूपासून विद्यार्थ्यानी सुंदर राख्या आपल्या कल्पनेतून साकारल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सविता   राऊत मॅडम, आशा खोत मॅडम, सारिका अवचार मॅड

शिव-शक्ती परिक्रमा

इमेज
  शिव-शक्ती परिक्रमा - पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन कार्यकर्त्यांकडून ठिक ठिकाणी जंगी स्वागत ; 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली' घोषणेनं परिसर दुमदुमला ! सर्व सामान्य जनता,  शेतकऱ्यांच्या सुखासाठी केली प्रार्थना नांदेड ।दिनांक ३०।  शिव-शक्ती दर्शन परिक्रमेतंर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी त्यांनी प्रार्थना केली. संस्थानच्या वतीनं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं.    महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी शिव-शक्ती दर्शन परिक्रमा करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत त्यांनी आज सकाळी श्रीक्षेत्र माहूर गडावर जाऊन रेणुकामातेची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचं हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत : 'कोण आली रे कोण आली' घोषणा गरजली --------------- म

संभाव्य दौ-याची पूर्वतयारी बैठक संपन्न

इमेज
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री परळीत येणार:शासन आपल्या दारी कार्यक्रम       बीड, दि. 30 (जि. मा. का.) :  शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्यातील परळी येथे  दिनांक 20 ते 25 सप्टेंबर 2023 च्या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात दि.30 ऑगस्ट 2023 रोजी पूर्वतयारीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या संभाव्य दौ-याच्या अनुषंगाने संबधित विभागाना करावयाच्या कामाबाबत सूचना दिल्या.  या बैठकीस जिल्हा परिषेदचे मुख्य कायकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी, बीडचे उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील, सामान्य प्रशासना उपजिल्हाधिकारी शैलेशी सुर्यवंशी आणि एसटी महामंडळाचे आगार प्रमुख अजय कुमार मोरे उपस्थित होते.          विविध विभागाच्या प्रमुखांनी त्यांची विभागाच्या विविध योजन

सोयाबीन वाळले, कारखान्याची उचल घेतलेली,बाकीची कर्ज :चिंताग्रस्त

इमेज
  दुष्काळाने वाढवली चिंता: कर्ज फेडण्याची भ्रांत; शेतकऱ्याने केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       पाऊस पडत नसल्याने पिके वाळून चालली आहेत. दुष्काळाने चिंता वाढवली असून आपल्यावरील कर्ज कसे फेडावे याच्या भ्रांतीत असलेल्या वैजवाडी ता.परळी वैजनाथ येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना   घडली आहे.        परळी तालुक्यातील वैजवाडी या गावचे रहिवासी असलेले बालाजी ज्ञानोबा ढाकणे वय 45 वर्षे या शेतकऱ्याने  शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.30) सकाळी उघडकीस आली. शेतीवरचे कर्ज व अन्य कर्जाची त्यांना चिंता लागलेली होती. यातच सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती, पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक जळत असल्याचे पाहून या चिंतेत आणखीनच वाढ झाली. सुगी तर हातची जाणार, आता आपण कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रस्त होत या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. घटनास्थळी तलाठी विष्णू गीते यांनी स्थळ पाहणी करून पंचनामा केला.  पोह तोटेवाड,पोह घरत, चालक गित्ते आदींनी भेट दिली आहे.       दरम्यान, मयत शेतकरी बालाजी ढाकणे यांना दोन एकर शेती आहे.यात त्यांनी सोयाबीन पीक घेतले होते. पावसाअभावी

✍️ अश्विन मोगरकर यांचा विशेष ब्लॉग >>>>>शिवशक्ती दर्शनाने मिळेल महाराष्ट्रातील जनशक्तीच्या बुलंद आवाजाचे वरदान !

इमेज
शिवशक्ती दर्शनाने मिळेल महाराष्ट्रातील जनशक्तीच्या बुलंद आवाजाचे वरदान !             पं कजाताई मुंडे महाराष्ट्राचा दौरा करणार. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तिपीठांसह राज्यातील अनेक मंदिरांच्या दर्शनासाठी आखलेला हा दौरा. या दौऱ्यात देवदर्शन सोबतच राज्यभरातील त्या त्या भागातील नेते, कार्यकर्त्यांच्या भेटी होणारच आहेत. यात कुठलाही राजकीय अर्थ काढायचा नाही म्हटलं तरीही पंकजताईंचा नऊ वर्षांनंतर संघर्ष यात्रेनंतर सर्वव्यापी असा हा दौरा असेल. 2014 ला काढलेल्या संघर्ष यात्रेच्या आठवणी अजूनही जनतेच्या मनात आहेत.           महाराष्ट्रातील चालू असलेल्या सत्तेच्या साठमारीत आज कोण कोणाकडे राहील हे सांगता येत नाही अशा काळात महाराष्ट्रातील राजकारणात पंकजाताई मुंडे मात्र आपल्या विचारावर ठामपणे उभ्या आहेत.  2019 विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांचे काय होणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. परंतु पंकजाताईनी कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आपलं समाजकार्य, पक्ष कार्य करत राहिल्या. प्रत्येक वेळी पंकजाताई मुंडे नाराज अशा पेडन्यूज चालवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्