मनमोकळ्या गप्पा ; लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक

 छत्रपती उदयनराजे भोसले व पंकजा मुंडे यांची मुंबईत कौटुंबिक भेट


मनमोकळ्या गप्पा ; लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक


मुंबई  । दिनांक ०१।

छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची आज निवासस्थानी सदिच्छा भेट झाली. स्नेहभोजन आणि मनमोकळ्या गप्पांसह दोघेही लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणीने भावूक झाले.


   छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही भेट कौटुंबिक होती. पंकजाताईंशी छत्रपती उदयनराजे यांचे बहिण-भावाचे नाते आहे.  पंकजाताईंनी यावेळी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर स्नेहभोजन आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या, छत्रपतींनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला, यावेळी ते दोघेही भावूक झाले. "छत्रपती उदयनराजे माझ्यासाठी माझे मोठे बंधू... आज माझ्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले होते. आमच्यात खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या.. मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक झालो...खरे ऋणानुबंध असेच असतात.." अशी प्रतिक्रिया पंकजाताईंनी यावेळी व्यक्त केली.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !