परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत

 कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या सुचनेचे बीड जिल्हा प्रशासनाकडून तंतोतंत पालन


जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25%  अग्रीम पीकविमा मंजूर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढली अधिसूचना


सोयाबीन, मूग व उडीद पिकांचा समावेश


शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत


बीड (दि. 30) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील  दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून, बीड जिल्ह्यातील सर्व 87 महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. 


बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळ सदस्य परिस्थिती असल्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करून अहवाल सादर करावा व अग्रीमे विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. 


त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी आज अधिसूचना निर्गमित केली असून महसूल, कृषी व पिक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या सर्व 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, उडीद व मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे, या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा अधिक असल्याने निकषानुसार ही सर्वच्या सर्व महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र आहेत व या सर्व महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश आज निर्गमित केले आहेत. 


धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे 87 महसूल मंडळातील सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा एक महिन्याच्या आत मिळेल, हे आता निश्चित झाले असून, या कठीण काळात हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!