इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

'संस्कृत दिन'

 वैद्यनाथ महाविद्यालयात 'संस्कृत दिन' साजरा



              *परळी वैजनाथ-दि.३*

                     सर्व भाषांची जननी व समग्र ज्ञान- विज्ञानाचे आगर म्हणून ओळख असलेल्या संस्कृत या प्राचीन भाषेत वैश्विक कल्याणाचे  विश्वाचे मूलभूत वैभव दडले असून या भाषेच्या अभ्यासाने मानवी जीवन धन्य होते, असे विचार प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आचार्य श्री सानंद यांनी मांडले.

        येथील वैद्यनाथ महाविद्यालयात नुकताच *संस्कृत दिन* साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ आर. डी. राठोड यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य एच.डी. मुंडे ,पर्यवेक्षिका प्रा.सौ. मंगला पेकमवार ,समन्वयक प्रा.यु. आर. कांदे उपस्थित होते. याप्रसंगी आचार्य श्री सानंद यांनी संस्कृत भाषेतील चिरंतन गुणवैशिष्ट्यांचा गौरव करून ही भाषा शिकण्यास अतिशय सोपी, सुलभ, शुद्ध, रंजक,गोड, रसपूर्ण व उच्च ज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले- 'प्राचीन ऋषी-मुनी व साहित्यिकांनी  संस्कृत भाषेतून साहित्य सृजन करून आध्यात्मिक व भौतिक प्रगती साधण्याचा मूलमंत्र दिला. आजच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे मूळ देखील संस्कृत भाषेतच दडले आहे.' अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.राठोड यांनी नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत भाषेला अत्यधिक महत्त्व येणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी या विषयातील सखोल ज्ञान आत्मसात करून सकारात्मक वाटचाल करावी असे आवाहन केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.डॉ. नयनकुमार आचार्य यांनी तर सूत्रसंचालन कु. पूजा नेमाने हिने केले.  प्रारंभी आनंद चाटे, गिरिजा गोस्वामी, पल्लवी औटी, रागिनी बोकन, वैष्णवी कदरे यांनी संस्कृत श्लोकगायन केले. तर शेवटी राहुल औटी याने आभार मानले. या प्रा.डा. एक.आर. चव्हाण, प्रा.डा.व्ही व्ही आर्य, प्रा .गया नागराव,प्रा. शेटे,प्रा. बिडकर, प्रा.गुट्टे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!