कर्तव्यनिष्ठता हेच उज्वल कार्याचे प्रतीक - डॉ. माधव रोडे

 कर्तव्यनिष्ठता हेच उज्वल कार्याचे प्रतीक - डॉ. माधव रोडे



परळी प्रतिनिधी- वैद्यनाथ कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर श्री. बी.डी. केदारे हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने आज विभागाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख, डॉ माधव रोडे होते, तर प्रमुख म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी.व्हि.केंद्रे होते. सत्कारमूर्ती श्री केदारे यांचा सत्कार डॉ. माधव रोडे,रोडे, डॉ केंद्रे, डॉ गीते आणि डॉ. विनोद  गायकवाड यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ केंद्रे यांनी श्री केदारे यांचा कार्यपरिचय देऊन गौरव उद्गार काढले. कार्यक्रमात डॉ.गीते, डॉ . विनोद गायकवाड,  प्रा वडाळ यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

अध्यक्ष समारोपात डॉ. माधव रोडे म्हणाले की,  श्री केदारे म्हणजे अल्प व मृदुभाषी,  संयमी, कार्यत्पर व्यक्ती असल्याने ते जीवनात समाधानी आहेत आणि समाधानी व्यक्तीच कर्तव्यनिष्ठ- उज्वल कार्याचे प्रतीक असतो असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.एम.जी. लांडगे यांनी मानले. या निरोप समारंभासाठी डॉ. मुंडे, डॉ सातपुते,  डॉ कलमे,  प्रा.गोरे, प्रा. कांदे, प्रा. रेणुकदास, श्री. चौकले, अनिल जगतकर, नाथराव मुंडे व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !