संभाव्य दौ-याची पूर्वतयारी बैठक संपन्न

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री परळीत येणार:शासन आपल्या दारी कार्यक्रम 


     बीड, दि. 30 (जि. मा. का.) :  शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्यातील परळी येथे  दिनांक 20 ते 25 सप्टेंबर 2023 च्या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात दि.30 ऑगस्ट 2023 रोजी पूर्वतयारीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या संभाव्य दौ-याच्या अनुषंगाने संबधित विभागाना करावयाच्या कामाबाबत सूचना दिल्या.

 या बैठकीस जिल्हा परिषेदचे मुख्य कायकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी, बीडचे उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील, सामान्य प्रशासना उपजिल्हाधिकारी शैलेशी सुर्यवंशी आणि एसटी महामंडळाचे आगार प्रमुख अजय कुमार मोरे उपस्थित होते. 

        विविध विभागाच्या प्रमुखांनी त्यांची विभागाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धीसाठी कार्यक्रमास्थळी स्टॉल लावावेत, कार्यक्रम स्थळी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका,आरोग्य विभागाचे टीम सज्ज ठेवावी. कुठल्याही प्रकारे  उपस्थितांची  गैरसोय होणार नाही याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, असेही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी यावेळी सूचित केले.   

                                                    ********

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार