इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

पंकजा मुंडेंची मागणी

 मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : सखोल चौकशीची पंकजा मुंडेंची मागणी


मुंबई....
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
   जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले.  यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले. यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलन स्थळी दाखल होत आहेत.या दरम्यान दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी ६ च्या दरम्यान अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर आश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा  पंकजा मुंडे यांनी निषेध केला आहे.
       याबाबत ट्विट करत पंकजा मुंडेंनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या