इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त परळीतील बहीण -भावाचा सत्कार

 राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त धनराज पिल्ले यांच्या हस्ते कु.सानवी व चि.सूर्या सौंदळे या बहीण -भावाचा सत्कार


    पद्मश्री व राजीव गांधी खेल रत्न तसेच अर्जून पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार श्री.धनराज पिल्ले यांच्या हस्ते थायलंड (पट्टाया) येथील एशियन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियन स्पर्धेतील सहभाग तसेच 16व्या व 17व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धा बेंगलुरू येथे सब ज्युनिअर गटातून अनुक्रमे गोल्ड मेडल व सिल्वहर मेडल प्राप्त केल्याबद्दल कु.सानवी सचिन सौंदळे तसेच 17 व्या बेंगलुरू येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टीक्स स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप मधून गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल चि.सूर्या सचिन सौंदळे या सख्या बहीण भावंडाचा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)येथे सत्कार व सन्मान करण्यात आला.

  चि.सूर्या व कु.सानवी यांनी जिम्नॅस्टीक खेळात मिळविलेल्या यशाबद्दल भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार श्री.धनराज पिल्ले यांनी अभिनंदन व कौतूक करून क्रिडा क्षेत्रातील दैदीत्यमान यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 चि.सूर्या व कु.सानवी परळीच्या सुपुत्र व सुकन्या असून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांचे पुतणे व पुतणी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या