इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

शिव-शक्ती परिक्रमा

 शिव-शक्ती परिक्रमा - पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन

कार्यकर्त्यांकडून ठिक ठिकाणी जंगी स्वागत ; 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली' घोषणेनं परिसर दुमदुमला !

सर्व सामान्य जनता,  शेतकऱ्यांच्या सुखासाठी केली प्रार्थना



नांदेड ।दिनांक ३०। 

शिव-शक्ती दर्शन परिक्रमेतंर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर जाऊन रेणुकामातेचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी त्यांनी प्रार्थना केली. संस्थानच्या वतीनं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं.


   महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी शिव-शक्ती दर्शन परिक्रमा करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत त्यांनी आज सकाळी श्रीक्षेत्र माहूर गडावर जाऊन रेणुकामातेची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचं हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं.


कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत : 'कोण आली रे कोण आली' घोषणा गरजली

---------------

माहूरला जाण्यासाठी पंकजाताई मुंडे यांचे सकाळी खासगी विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झाले. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील यावेळी त्यांच्यासमवेत होते.भाजपचे प्रदेश चिटणीस देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, प्रवीण चिखलीकर, पूजा पवार, व्यंकटेश चाटे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. माहूरकडे जाताना रस्त्यात  अर्धापूर, वारंगा फाटा, हदगांव आदी ठिक ठिकाणी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून  कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. 'कोण आली रे आली, महाराष्ट्राची वाघिण आली' या घोषणेनं परिसर दणाणून गेला होता. दरम्यान,  माहूर शहरातही  भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या