इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

भेल स्कुलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा

भेल स्कुलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा



परळी वैजनाथ :-(दिनांक -30) भेल स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा. सर्वत्र रक्षाबंधन या सणाचा उत्साह असताना भेल स्कूल मध्येही विविध उपक्रम व स्पर्धा घेऊन हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट व पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणून ओळखला जातो. या सणाच्या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. तर बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या उज्वल यशाची कामना व्यक्त करते. राखी पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीमधील अतिशय प्राचीन व वैशिष्टपूर्ण असलेला सण आहे.विदयालयातील विद्यार्थिनींनी प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विदयार्थ्यांना राख्या बांधून औक्षवण केले. यावेळी विद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. आज विद्यालयात राखी बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. झाडांची पाने, फुल, विविध धान्य व पेपर अस्या वस्तूपासून विद्यार्थ्यानी सुंदर राख्या आपल्या कल्पनेतून साकारल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सविता   राऊत मॅडम, आशा खोत मॅडम, सारिका अवचार मॅडम व गोहिल मॅडम यांनी काम पाहिले.स्पर्धा व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी योगदान दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या