इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा गाडीही रद्द

 पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा गाडीही रद्द 



परळी रेल्वे स्थानकावरून धावणारी महत्वाची रेल्वे गाडी असलेली पूर्णा-हैद्राबाद डेक्कन-पुर्णा ही रेल्वेमार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामानिमित्त रद्द करण्यात आलेली आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग अंतर्गत चालणाऱ्या अनेक गाड्या रद्द व अंशतः रद्द करण्यात आलेल्या असून त्यात रेल्वेस महसुली उत्पन्न देणारी पूर्णा-हैदराबाद डेक्कन-पुर्णा हे रेल्वे गाडी काही दिवस रद्द करण्यात आलेली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.


दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार पूर्णा- हैदराबाद-पूर्णा एक्स्प्रेस गाडी रोलिंग ब्लॉक कामामुळे काही दिवस रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 17648 पूर्णा – हैदराबाद एक्स्प्रेस दि 05 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर, 2023 तर गाडी क्रमांक 17647 हैदराबाद –  पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 06 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर, 2023   दरम्यान रद्द करण्यात आली  आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या