प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

सोयाबीन वाळले, कारखान्याची उचल घेतलेली,बाकीची कर्ज :चिंताग्रस्त

 दुष्काळाने वाढवली चिंता: कर्ज फेडण्याची भ्रांत; शेतकऱ्याने केली आत्महत्या



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      पाऊस पडत नसल्याने पिके वाळून चालली आहेत. दुष्काळाने चिंता वाढवली असून आपल्यावरील कर्ज कसे फेडावे याच्या भ्रांतीत असलेल्या वैजवाडी ता.परळी वैजनाथ येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना   घडली आहे.

       परळी तालुक्यातील वैजवाडी या गावचे रहिवासी असलेले बालाजी ज्ञानोबा ढाकणे वय 45 वर्षे या शेतकऱ्याने  शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.30) सकाळी उघडकीस आली. शेतीवरचे कर्ज व अन्य कर्जाची त्यांना चिंता लागलेली होती. यातच सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती, पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक जळत असल्याचे पाहून या चिंतेत आणखीनच वाढ झाली. सुगी तर हातची जाणार, आता आपण कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रस्त होत या शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. घटनास्थळी तलाठी विष्णू गीते यांनी स्थळ पाहणी करून पंचनामा केला.  पोह तोटेवाड,पोह घरत, चालक गित्ते आदींनी भेट दिली आहे.

      दरम्यान, मयत शेतकरी बालाजी ढाकणे यांना दोन एकर शेती आहे.यात त्यांनी सोयाबीन पीक घेतले होते. पावसाअभावी हे पीक वाळून जात आहे हे पाहून व कर्ज कसे फेडणार या विवंचनेत ते होते.त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट