इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

'शिव-शक्ती' परिक्रमेची सुरूवात

 पंकजा मुंडे यांच्या 'शिव-शक्ती' परिक्रमेची श्री  घृष्णेश्वरच्या दर्शनाने होणार सुरूवात



स्वागतासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी ; परिक्रमा १२ जिल्हयात जाणार - टिझर झाला प्रचंड व्हायरल


परळी वैजनाथ ।दिनांक ०३।

 शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची परिक्रमा उद्यापासून (ता. ४) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू होत आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा  प्रवास परिक्रमेचा असणार आहे.  या परिक्रमेचा  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी होत आहे.


  उद्या सोमवारी सकाळी ८ वा. पंकजाताई मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ७ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील पांडूरंग काॅलनी गारखेडा परिसरात संत भगवान बाबा मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील. दरम्यान परिक्रमेचा टिझर आज प्रचंड व्हायरल झाला. पराक्रम खूप केले, आता परिक्रमा करू असं सांगत पंकजाताई मुंडे यांनी शिव आणि शक्तीचं दर्शन घेण्यासाठी आपणही सहभागी व्हा  असं आवाहन केलं आहे.


*शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास*

----------

*४ सप्टेंबर* - सकाळी ८ वा. 

घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर), दुपारी ३.३० वा. सप्तश्रृंगी गड वणी (जि. नाशिक), सायं ६ वा. दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट,

 *५ सप्टेंबर* सकाळी ७.३० वा.

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), दुपारी ४ वा. भीमाशंकर (जि. पुणे),  *६ सप्टेंबर* सकाळी १०.१५ वा.

जेजुरी, दुपारी १२.१५ वा.शिखर शिंगणापूर दर्शन (जि. सातारा ), रात्रौ ८.३० वा. कोल्हापूर (जि. कोल्हापूर) येथे अंबामातेचे दर्शन 

*७ सप्टेंबर* दुपारी १ वा. पंढरपूर(जि.सोलापूर), संध्याकाळी ६.३० वा. अक्कलकोट *८ सप्टेंबर* सकाळी ११ वा. गाणगापूर दर्शन, सायं ५ वा. तुळजापूर (जि. धाराशीव) भवानी देवीचे दर्शन, 

*९ सप्टेंबर* सकाळी ११ वा. करमाळा, दुपारी २.१० वा. पाटोदा (जि. बीड) येथे संत भगवानबाबा जयंती कार्यक्रम, *१० सप्टेंबर*

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथे दर्शन, *११ सप्टेंबर* परळी (जि. बीड) येथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाने परिक्रमा समाप्त होईल. या प्रवासात पंकजाताई हया अहमदनगर, सांगली, परभणी या जिल्हयातूनही जाणार आहेत.



••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या