शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

 मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा


मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे- अभयकुमार ठक्कर


परळी / प्रतिनिधी 

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांनी यावेळी आंदोलन कर्ते शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे व राष्ट्रवादी तालुका प्रमुख लुगडे महाराज  यांना जाहीर पाठिंबा दिला असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असेही ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

      मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी शनिवारी (ता २) बेमुदत ठिय्या सुरुवात झाली आहे. ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता.4) शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभय कुमार ठक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी  आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करीत आहे. त्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला आहे. ही घटना निंदनीय आहे. शिवाय मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी श्री अभयकुमार ठक्कर यांनी केली आहे.

यावेळी शिवसेनेचे माजी उप शहरप्रमुख सतीश जगताप,उप शहरप्रमुख किशन बुंदेले, माजी शहर संघटक संजय कुकडे युवासेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी आदि दिसत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !