2018 मध्ये याच मैदानावर झाले होते तब्बल 21 दिवस आंदोलन

 मोठी बातमी- मराठा आंदोलन : परळीत पुन्हा सुरु होणार बेमुदत ठिय्या आंदोलन



2018 मध्ये याच मैदानावर झाले होते तब्बल 21 दिवस आंदोलन

परळी वैजनाथ,  वृत्तसेवा....

           सध्या महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले आंदोलन, जालना जिल्ह्यात झालेला लाठीचार्ज व त्यानंतर त्याचे उमटलेले पडसाद या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या परळीत पुन्हा एकदा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. आज सायंकाळच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोर शड्डू ठोकत ठिय्या आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. हे आंदोलन बेमुदत असणार असून यापूर्वी परळीत 21 दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन करण्यात आले होते.


Click:■ *मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : सखोल चौकशीची पंकजा मुंडेंची मागणी*


       मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने 17 जुलै 2018 पासून तब्बल 21 दिवस मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर परळी येथे आंदोलन झाले होते. या आंदोलनाने संपूर्ण राज्यात खळबळ उडून गेली होती. मराठा आरक्षण आंदोलनातील ऐतिहासिक आंदोलन म्हणून याकडे पाहिले जाते. तब्बल 21 दिवस झालेले हे आंदोलन  संपूर्ण राज्यात  मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू बनले होते.त्याच मैदानावर, त्याच जागेवर परळीत पुन्हा एकदा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार सकल मराठा समाजाने पुकारला असून आता माघार नाही अशा प्रकारचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे.     

       दरम्यान परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोरील मैदानात आंदोलनकर्त्यांनी आज सायंकाळच्या सुमारास शड्डू ठोकला असून आता माघार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा परळीत केंद्रित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार