माकपचाही बंदला पाठिंबा

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध : माकप

परळी वैजनाथ, जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१) अमानुष लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार केला. पोलिसांच्या या अमानुष कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र शब्दात धिक्कार करत आहे.


देशभरातील सर्व प्रमुख विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रात हजर असताना आंदोलकांवर झालेला हल्ला म्हणजे राज्य सरकार कुणालाच जुमानत नसल्याचे व विरोध करणारांना चिरडून काढणार असल्याचा संदेश देणारे आहे. राज्य सरकारचा हा दृष्टिकोन अत्यंत निषेधार्ह आहे. राज्य सरकारच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निषेध करीत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक व महिलांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार करुन अनेकांना जखमी केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा असल्याची माहिती जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे, ॲड. अजय बुरांडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !