इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

जनता जनार्नदाचे हे प्रेम असेच अबाधित राहो हिच इच्छा

 श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने प्रचंड उत्साहात सुरू झाली पंकजा मुंडेंची शिव-शक्ती परिक्रमा

कार्यकर्त्यांकडून जागोजागी जंगी स्वागत ; आबालवृद्ध, महिला स्वागतासाठी रस्त्यावर; सुवासिनींनी केले औक्षण अन् फुलांचा वर्षाव


परिक्रमेला निघतांना  छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबांना केले वंदन





जनता जनार्नदाचे हे प्रेम असेच  अबाधित राहो हिच इच्छा


छत्रपती संभाजीनगर ।दिनांक ०४। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या शिव-शक्ती परिक्रमेला सुरूवात केली. कार्यकर्त्यांनी  प्रचंड आणि सळसळता उत्साहाने यावेळी त्यांचे जागोजागी जंगी स्वागत केले. आबालवृद्ध, महिला त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरल्या, ठिकठिकाणी फुलांचा वर्षांत करत सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं. 


    पंकजाताई मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा आजपासून सुरू झाली. सकाळी त्यांनी वेरूळ येथे श्री घृष्णेश्वरास विधिवत पूजा, अर्चना करून  दर्शन घेतले. पावसा अभावी महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर कर अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. दर्शनानंतर उपस्थित जनता, कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. शिव आणि शक्तीच्या दर्शनाबरोबरच जनता जनार्नदाचे दर्शन घेण्यासाठी मी आले आहे, आपलं हे प्रेम तसुभरही कमी होऊ नये  ते असेच अबाधित राहो असं त्या यावेळी म्हणाल्या.


जागोजागी वाजत-गाजत जंगी स्वागत; महिलांनी केला फुलांचा वर्षाव : महापुरूषांना वंदन

----------------

घृष्णेश्वरला जाण्यापूर्वी सकाळी पंकजाताई मुंडे यांनी गारखेडा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच गजानन काॅलनीत संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त संत भगवान बाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचे वाजत-गाजत जंगी स्वागत करण्यात आले. आबालवृद्ध तसेच लहान मुले, महिला स्वागतासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरल्या होत्या. सुवासिनींनी औक्षण करून त्यांच्यावय फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर पडेगाव ते घृष्णेश्वर पर्यंत जागोजागी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट