पोस्ट्स

देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव

इमेज
  देवाच्या नाही तर शेतक-याच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव परळी / प्रतिनिधी  देवाच्या नावाने चालणारे अनेक कीर्तन महोत्सव पाहिले, परंतु शेतक-यांच्या नावाने सुरू असलेला हा एकमेव कीर्तन महोत्सव आहे, असा सूर शेतकरी कीर्तन महोत्सवात आलेल्या सर्व वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ख-या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची ही सुरूवात म्हणता येईल,  असे मतही अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन 21 गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरू केलेल्या कीर्तन महोत्सवाचा दुसरा दवस विविध उपक्रमाने संपन्न झाला. सकाळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिरात बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही सहभागी झाली होती.  ●●●●●●●●●●●●● *सुविधा वाढल्या,समाधान हरवले - डाॅ. हमीद दाभोळकर* जग वेगाने बदलत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अनेक सुविधा वाढल्या आहेत. सुविधा वाढल्या असल्या तरी माणूस समाधानी झाला नाही उलट तो अधिक तणावात गेला आहे. विशेषतः 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिडताना दिसत आहे. त्यातून आपल्या देशात वर्षाल

यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेश फड

इमेज
  ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हेच आपले ध्येय-प्रदिप खाडे   यश इंटरनॅशनलचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकतील- उद्योजक सुरेश फड   विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाकडे लक्ष द्यावे- सपोनि खोडेवाड विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रसिक झाले मंत्रमुग्ध यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवुन शाळा सुरु केली.आज आमच्या कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या अनेक शाळा,कॉलेजमधून शिक्षण घेत विद्यार्थी उच्च पातळीवर पोंहचत आहेत यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे आमचे स्वप्न पुर्ण झाले असुन भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करु असे प्रतिपादन कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांनी केले. स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित हजारो रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते.    कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल सीबीएसई

भव्य कमानी, आकर्षक कटआउट्सने परळी शहर सजले

इमेज
  लाडक्या लेकिचे उद्या परळी विधानसभा मतदार संघात आगमन ! पंकजा मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी ढोल - ताशांच्या  गजरात जेसिबीतुन होणार फुलांची उधळण*  *गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक तर कौठळी तांडा येथील होळी कार्यक्रमात होणार सहभागी *परळी नगरी स्वागतासाठी सजली, भव्य कमानी, आकर्षक कटआऊटसने वेधले लक्ष*  मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाई - मित्र पक्षांचे आवाहन परळी वैजनाथ           भाजपा व मित्रपक्षाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्या दिनांक 24 मार्च रोजी प्रथमच परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आगमन होणार आहे. लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी विधानसभा मतदारसंघ सज्ज झाला असून त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागताची तयारी  करण्यात आली आहे. पंकजाताई मुंडे या प्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. कौठळी तांडा येथील होळी महोत्सवात सहभाग घेतल्यानंतर त्यांचे थाटात परळी शहरात आगमन होणार आहे. ढोल ताशांच्या गजरांमध्ये त्यांच्यावर जेसीबी मधून फुलाची

पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंब्याचा दिला शब्द ; सावरगावला झाली पेढेतुला

इमेज
  लेकीला मिळाले जिल्हयातील श्रध्देय गडांचे आशीर्वाद ! श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगड, नारायणगडावर पंकजाताई मुंडे नतमस्तक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंब्याचा दिला शब्द ; सावरगावला झाली पेढेतुला बीड । दिनांक २३। बीड लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काल व आज जिल्हयातील श्रध्देय गडांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. जिल्हयातील जनतेच्या ऋणात नेहमी असावे, त्यांचेवरील प्रेम कधीही कमी होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गड परिसरातील ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला.    लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे शुक्रवारी बीडमध्ये आल्या. धामणगांव इथं जल्लोषात स्वागत झाल्यानंतर काल रात्री त्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर जाऊन श्रध्देय वामनभाऊ, राष्ट्रसंत भगवान बाबा, कुसळंब येथील खंडेश्वर यांचे आशीर्वाद घेतले. आज सकाळी धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर जावून त्यांनी संत नगद नारायण महाराजांचे आशीर्वाद घेतले. दोन्ही गडावर त्यांना महंत

आजचं स्वागत, विजयाची नांदी

इमेज
  लेकीसाठी जिल्हयाच्या एकीची वज्रमूठ !  बीडच्या वेशीवर पंकजाताई मुंडेंचं 'न भूतो न भविष्यती' स्वागत मी मतांचं नाही विकासाचं राजकारण करते ; जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी साथ द्या - पंकजाताई मुंडे यांची जनतेला साद आष्टी ।दिनांक २२।  राजकारण करत असताना मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही की कधी जातीभेद केला नाही. मायनस असणाऱ्या गावांनाही करोडो रूपयांचा निधी दिला. मी मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, त्यासाठी मला साथ द्या अशा शब्दांत भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला साद घातली.    नगरहून प्रस्थान केल्यानंतर बीडच्या वेशीवर धामणगांव इथं पंकजाताई मुंडे यांचं दुपारी थाटात आगमन झालं. लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मोठया जल्लोषात, मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केले. खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. सत्कारानंतर  जनतेशी संवाद साधताना त्या बोल

श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक

इमेज
अलोट गर्दी: पंकजा मुंडेंची पाथर्डीत ओपन जीपमधून मिरवणूक ; फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक तुमच्या जीवावर मैदानात उतरलेयं; आशीर्वाद अन् साथ द्या पाथर्डी ।दिनांक २२। बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल मावशीच्या भूमीत म्हणजे पाथर्डी शहरात आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण करत अलोट गर्दीच्या साक्षीनं कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पाच वर्ष संघर्ष केला, आता तुमच्या जीवावर मैदानात उतरले आहे, आशीर्वादाची शिदोरी माझ्या झोळीत टाका असं आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलतांना केलं.    पंकजाताई मुंडे काल नगर येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्कामास होत्या. खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचं स्वागत केलं. सकाळी नगरहून पाथर्डीकडे रवाना होताना  रस्त्यात मेहकरी फाटा, करंजी, देवराई, तिसगाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केल्यानंतर पाथर्डीत त्यांचं आगमन झालं. इथं त्यांच्या स्वागताला अलोट जनसागर लोटला होता, त्यांची व

नगरकडे जाताना स्वागतासाठी कार्यकर्ते रस्त्या रस्त्यावर ; जेसीबीने फुलांची उधळण

इमेज
  मिशन लोकसभा - बीड दौऱ्याआधी पंकजाताई मुंडे यांचं पुण्यात जंगी स्वागत पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळांना दिल्या शुभेच्छा ; ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद पुणे ।दिनांक २१। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचं आज पुण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत झालं. पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.  दरम्यान पुण्याहून नगरकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिक ठिकाणी त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत झालं.    बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे उद्या नगरमार्गे बीडच्या हद्दीत येत आहेत. धामणगांव आष्टी येथे त्यांच्या मोठया स्वागताची तयारी सुरू आहे. बीडला येण्यापूर्वी त्या आज दुपारी पुण्यात आल्या. आमदार माधुरीताई मिसाळ यांनी त्यांचं निवासास्थानी स्वागत केलं. नंतर  लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. इथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. मोहोळ यांना औक्षण करून त्यांनी विजयाच

मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक: जल्लोष पडला महागात: २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
  मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक: जल्लोष पडला महागात: २६ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक काल दि.२० रोजी आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने या बैठकीला प्रशासनाने नाकारण्यात आलेली परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा होत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला होता.या प्रकरणात २६ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे दि. 20.03.2024 रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व सन 2024 चे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेचे अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन २६ जणांविरुद्ध  पोलीस ठाणे परळी शहर येथे गु.र.नं. 46/2024 कलम 188 भा.द.वि. सह कलम 135 म. पो. अधिनियम प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  पो.ना. 1918 भताने हे करीत आहेत.

जनतेने आतापर्यंत जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता जनसेवेचे कार्य करणाऱ्यालाच प्राधान्य दिले

इमेज
  बीडमधील मतदार हा जाणता राजा ; सन्मानजनक विजयाची मला खात्री- पंकजा मुंडे जनतेने आतापर्यंत जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता जनसेवेचे कार्य करणाऱ्यालाच प्राधान्य दिले   पुणे,।दिनांक २१।  बीड जिल्ह्यातील जनता ही राजकीय दृष्ट्या अतिशय परिपक्व व प्रगल्भ आहे. बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहासही असाच राहिला आहे. जातीपातीच्या राजकारणात न पडता बीड येथील जनतेने आत्तापर्यंत जाणतेपणानेच प्रामाणिकपणे जनसेवेचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपला खासदार निवडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मतदार हा जाणता राजा असून या जाणत्या राजाचे आपल्यावर भरभरून आशीर्वाद व प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला सन्मानजनक विजयाची नक्कीच खात्री असल्याचा आत्मविश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.     पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला पंकजा मुंडे यांनी आज ( गुरूवार) भेट दिली. यावेळी आ. माधुरी मिसाळ त्यांच्यासमवेत होत्या. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांबरोबर संवादही साधला. बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच आपल्या मतदार संघात जात असुन  मार्

महासंवाद बैठक: मनोज जरांगे-पाटील

इमेज
  आचारसंहिता संपणारच आहे;मग यांच्याशी खेटू - मनोज जरांगे पाटलांचा परळीतून सरकारला इशारा परळी वैजनाथ, प्रतिनिधी           मराठा समाजाचा शिक्का काय असतो ते 24 तारखेच्या व्यापक बैठकीतून सकल मराठा समाज निर्णय घेऊन दाखवून देईल असे सांगून विनाकारण खोटे गुन्हे व दडपशाही सरकारच्या इशाऱ्यावरून सुरू आहे. ती बंद करा. आचारसंहितेच्या नावाखाली चालवली जाणारी दडपशाही मराठा समाज खपवून घेणार नाही. आचारसंहिता संपणारच आहे मग यांच्याशी खेटू असा सज्जड इशारा  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील  यांनी सरकारला  परळी येथील महासंवाद बैठकीतून दिला.              मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज दि. २० रोजी परळी वैजनाथ येथे  महासंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने आचारसंहितेचे कारण सांगून या महासंवाद बैठकीला परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे परळीची मनोज  जरांगे-पाटील  यांची महासंवाद बैठक चर्चेत आली होती. दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने परवानगीसाठी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. त्यानंतर आजच उच्च न्यायालयाने या बैठकीला सशर्त परवानगी दिली. मनोज जरांगे-पाटील

मनोहरअप्पा मोगरकर यांचे निधन

इमेज
  मनोहरअप्पा मोगरकर यांचे निधन परळी (प्रतिनिधी)   वीरशैव समाजातील ज्येष्ठ नागरिक  मनोहरअप्पा वैजनाथअप्पा मोगरकर यांचे वयाच्या 83 व्या वर्षी  बुधवार दि 20 मार्च 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता  निधन झाले आहे.माजी शिक्षण सभापती, जेष्ठ पत्रकार शंकर अप्पा मोगरकर यांचे जेष्ठ बंधू होत.  गणेशपार भागातील रहिवासी असलेले मनोहरअप्पा मोगरकर हे प्रगतीशील शेतकरी म्हणुन ओळखले जात.शांत,सुस्वभावी असलेल्या मनोहरअप्पांचा सामाजिक,धार्मिक कार्यात सहभाग असायचा.बुधवार दि.20 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात 1 मुलगा,सून,नातवंडे,3 मुली असुन त्यांच्या पार्थिवावर मोगरकर यांचे शेत, राम नगर समोर,नंदागौळ रोड, परळी येथे अंत्यविधी करण्यात आले.
इमेज
  सकल मराठा समाजाला दिलासा; परळीच्या बैठकीसाठी तात्काळ परवानगी देण्याचे कोर्टाचे आदेश छत्रपती संभाजीनगर,वृत्तसेवा            मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यात परवानगी देत असताना कोर्टाने जरांगे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन न करण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य करू नये असे म्हटले आहे.         मराठा आरक्षण यौद्धे मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात संवाद दौरा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. ठिकठिकाणी  मराठा समाजबांधवांशी ते संवाद साधत आहेत. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करून मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे आदि मागण्याबाबत सरकारने फसवणूक केल्यामुळे जरांगे पूर्वीपेक्षा आक्रमक शैलीत संवाद साधत आहेत. मराठा आरक्षण आंदोलने गावपातळीवर मोठ्या प्रमाणात झाली आहेत. लोकप्रतिनिधी, नेत्यांना गावात प्रवेश नाकारला जात आहे. मराठा आरक्षण ‘ओबीसी’ प्रवर्गातूनच घेणार, असे जाहीर करीत मनोज जरां

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, नारायणगड, भगवान भक्तीगडाचे घेणार आशीर्वाद

इमेज
  बीड जिल्हयाच्या सीमेवर लेकीचं होणार भव्य स्वागत ! २२ तारखेला पंकजाताई मुंडे धामणगांव, आष्टीत ; २३ ला बीड, गेवराईत तर २४ मार्चला परळीत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, नारायणगड, भगवान भक्तीगडाचे घेणार आशीर्वाद बीड ।दिनांक१९। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं येत्या २२ मार्च रोजी जिल्हयात आगमन होत आहे. जिल्हयाच्या सीमेवर धामणगांव इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या दौऱ्यात पंकजाताई मुंडे जिल्हयाचं श्रद्धास्थान असलेल्या विविध गडांना भेटी देऊन आशीर्वाद घेणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध नेतेमंडळींनाही त्या भेटणार आहेत.     पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाने त्यांचा दौरा जाहीर केला आहे. त्यानुसार पंकजाताई २१ मार्चला अहिल्यानगर येथे असणार आहेत. दुसर्‍या दिवशी  २२ तारखेला त्या सकाळी ११.३० वा. श्रीक्षेत्र मोहटा देवीचं (ता. पाथर्डी) दर्शन घेणार आहेत. दुपारी १ वा. त्यांचं बीड जिल्हयाच्या सीमेवर धामणगाव (ता. आष्टी) इथं जिल्ह्याच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात येण

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करावे : जिल्हाधिकारी

इमेज
  राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करावे : जिल्हाधिकारी         बीड, दि. 17 मार्च (जिमाका) :-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधीनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची वेठक झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते.             यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात ५ प्रतिनिधीनां प्रवेश देण्यात

39 - बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकाशन :पारदर्शक निवडणुकीसाठी संदर्भिका महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी

इमेज
  39 - बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकाशन पारदर्शक निवडणुकीसाठी संदर्भिका महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी         बीड, दि. 17 मार्च (जिमाका) :-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते 39 - बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकशन आज झाले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी यासाठी ही संदर्भिका महत्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.                आज पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संदर्भिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव,   उपजिल्हानिवडणूक अधिकारी  महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते.                ही संदर्भिका जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, बीड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी 18

अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड

इमेज
  अभयकुमार ठक्कर व प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गर्शनाखाली जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड परळी/प्रतिनिधी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक शिवसेना नेते अभयकुमार उर्फ पप्प्पूअण्णा ठक्कर व प्रमुख मार्गदर्शक युवा नेते प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 16 मार्च रोजी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पुढील कार्यकारणी :-कार्याध्यक्ष बबन ढेंबरे, उपाध्यक्ष - किशन बुंदेले, अमित कचरे, सचिव - मनीष जोशी, सह सचिव - बजरंग औटी, कोषाध्यक्ष - योगेश घेवारे, सह कोषाध्यक्ष - सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, संघटक - योगेश जाधव, सह संघटक - लक्ष्मण मुंडे, प्रकाश देवकर, प्रसिद्धी प्रमुख - माऊली मुंडे, सह प्रसिद्धी प्र

बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा

इमेज
  अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल रोजी पाठक मंगल कार्यालयात भव्यदिव्य सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा बीड दि.१७ (प्रतिनिधी):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा बीडच्या वतीने चैत्र कृ.४ रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी पाठक मंगल कार्यालय नगर रोड ,बीड येथे सकाळी ठिक ११.३१ वा. या शुभमुहूर्तावर भव्यदिव्य, विधिवत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास संत, महंत, वेदमूर्ती, प्रतिष्ठित मान्यवर, महिला पुरुष समाजबांधवाचे मौज सोहळ्यास आशीर्वाद लाभणार आहेत. या संस्कार सोहळ्यत ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा उपनयन संस्कार करावयाचा आहे अशा इच्छुक पालकांनी त्वरीत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी संपर्क ॳॅड.रविंद्र सुधाकरराव देशमुख मो.क्र. ९४२२३३२०५३, ॳॅड.समीर चंद्रशेखरराव पाटोदकर मो.क्र. ९८५०५९०६५६, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी मो.क्र.९२२६८७५६७०, बाळासाहेब जोशी (खडकीकर) मो.क्र.९४२१२७७८२४, नितीशकुमार कुलकर्णी मो.क्र.९८६०७७७५७२ या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अख

कार्यक्रमांच्या आयोजनांवर राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी

इमेज
निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म आणि भाषावार कार्यक्रमांच्या आयोजनांवर  राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी बीड, दि. 16 मार्च (जिमाका)  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम आज जाहीर  केला आहे. आजपासून आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आली असल्याची माहिती पत्रकारद्वारे जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी कळविली आहे.  जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आलेले आहे, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक  आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध राहतील.   प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले असून हे आदेश आज श

कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय

इमेज
  अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालयात वसतिगृह बांधकामास 14 कोटी 87 लाख, तर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृह दुरुस्तीसाठी 5 कोटी 48 लाख निधी मंजूर कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय मुंबई (दि.16) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीच्या कामास 14 कोटी 87 लाख रुपये तसेच अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी 5 कोटी 48 लाख रुपये असे एकूण 35 कोटी 22 लाख रुपये निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला आहे.  माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनीही  याबाबत मागणी व पाठपुरावा केला होता.   दोन्ही कामांसाठी एकूण 35 कोटी 22 लाख रुपये इतका निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला असून या दोन्ही वसतीगृहांच्या कामांमुळे येथील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.  धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून, कृषी विभागाच्या माध्यमातून देखील जिल्ह्यासाठी कृषी भवन त्याचबरोबर जिल्ह्यात सो

केंद्र सरकारने ॲड दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

इमेज
  केंद्र सरकारने ॲड. दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)          येथील न्यायालयात  वकील म्हणून कार्यरत असलेले ॲड दत्तात्रय आंधळे यांची केंद्र सरकारने नोटरी वकील म्हणून नियुक्ती केले बद्दल त्यांचा हृदय सत्कार परळी येथील मोंढा मार्केट मधील आडत व्यापारी श्री नामदेवराव वसंतराव गित्ते यांचे तर्फे करण्यात आला.            यावेळी आडत व्यापारी श्री लक्ष्मण बाबुराव मुंडे सोनहिवरेकर,आडत व्यापारी श्री रामराव अशोक गित्ते,श्री सूर्यकांतराव गुट्टे हाळम, श्री अनिल कदम ,माऊली फड नंदागौळ, हरिभाऊ कराड, सुभाषराव कराड, श्री माऊली गुट्टे, सिध्देश्वर रायभोळे आदींनी ॲड दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार केला.

शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव

इमेज
  शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव .......... नांदेड दिनांक 15 मार्च प्रतिनिधी शृंगेरीच्या श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महास्थान दक्षिणाम्नाय श्री शारदापीठ यांच्याकडून नांदेड येथील सौ. अनिता अनिलराव नेरलकर ( आशा प्रभाकरराव चाटूफळे ) यांना श्रीमदभगवतगीतेतील संपूर्ण 18 अध्याय व 700 श्लोक मुखोद्ग्त करण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोख एकवीस हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. श्री श्री विदुशेखर भारती महास्वामी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सौ. अनिता नेरलकर यांनी आजपर्यंत पाचशेहून अधिक भाविकांना गीतेची संथा व अर्थासहित पाठांतर करून घेतले आहे. तसेच शंभरहून अधिक भाविकांना विष्णुसहस्त्रनाम अर्थासहित संथा देऊन पाठांतर करून घेतले आहे. पुणे येथील गीता धर्म मंडळाद्वारे पाच वर्षापासून भगवद्गीतेचे पाठांतर व संथा देण्याचे त्या ऑनलाइन द्वारे अध्यापनाचे कार्य करतात. तसेच योग विद्याधाम नाशिकच्या नांदेड शाखेच्या त्या उपाध्यक्षा व प्राध्यपिका असून प्रवेश परिचय, प्रबोध योगनि

ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य विषयक प्रबोधन

इमेज
◆आध्यात्मिक चळवळीला नवी दिशा देणारा:शेतकरी कीर्तन महोत्सव 21 मार्चला प्रारंभ परळी / प्रतिनिधी कीर्तन परंपरेतून आलेले ज्ञान,  आधुनिक जगातील विज्ञान आणि वैद्यकीय अभ्यासातून घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबत प्रबोधन करणारा दुसरा कीर्तन महोत्सव 21 मार्च पासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत संजय आवटे आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज यांच्या उपस्थितीत होणार असून 21 गावांनी एकत्र येऊन तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती या सोहळ्याचे संकल्पक शेतकरी नेते एड. अजय बुरांडे यांनी दिली. शेतकरी वर्गाला केंद्र स्थानी ठेऊन आयोजिलेल्या या कीर्तन महोत्सवात कोणत्याही प्रकारचा झगमगाट न करता प्रबोधनाला प्राधान्य दिले जाते. या वर्षी या कीर्तन महोत्सवात शेतकरी आरोग्याला प्राधान्य दिले असून दर दिवशी एका आजारावर आरोग्य शिबीर आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.  या कीर्तन महोत्सवात नेत्ररोग तज्ञ प

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतलं वैद्यनाथाचे दर्शन

इमेज
  परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतलं वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी         परभणीचे खासदार तथा शिवसेना (उबाठा ) उपनेते संजय उर्फ बंडू जाधव यांनी पंचम ज्योतिर्लिंग  वैद्यनाथाचे दर्शन घेतले.     देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या प्रभू  श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे गुरुवारी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सपत्निक दर्शन घेतले व श्री प्रभू वैद्यनाथाची पूजा, आरती करून  त्यांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिराचे पुरोहित राजाभाऊ दगडगुंडे ,योगेश स्वामी यांनी अभिषेक पूजा केली.यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने खासदार संजय जाधव , सौ. क्रांती संजय जाधव यांचे   मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख, इंजिनीयर मुकुंद देशपांडे, लोकमतचे प्रतिनिधी संजय खाकरे ,  शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश चौंडे ,अतुल दुबे, उपस्थित होते.

सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे

इमेज
  सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे परळी/ प्रतिनिधी      सत्ताधारी व्हा आणि आपले प्रश्न सोडवा हा मोलाचा संदेश बहुजन समाज पार्टीचे संस्थापक  बहुजन नायक काशीराम यांनी बहुजन समाजाला दिला असे प्रतिपादन अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे यांनी केले .ते कांशीराम यांच्या 90 व्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.     लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 15 मार्च रोजी कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा संपादक नितीन ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट डी एल उजगरे होते . पुढे बोलताना नितीन ढाकणे म्हणाले की काशीराम यांनी पंधरा विरुद्ध  पंचाऐशी हा सिद्धांत मांडला. व बहुजन समाज सत्ताधारी होऊ शकतो हे दाखवून दिले. यावेळी बाबासाहेबांचे जाती व्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक कांशीराम यांच्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.यावेळी डी.एल. उजगरे बोलताना यांच्या विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच औरंगाबाद येथील जाहीर सभेत कांशीराम यांनी जवळ घेऊन

लोकसभेत पंकजाताईंचा सर्वाधिक मतांनी विजय हेच माझं टार्गेट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

इमेज
  राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं माझ्यासाठी सन्मानजनक ; नवीन जबाबदारी हुरहूर वाढवणारी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना लोकसभेत पंकजाताईंचा सर्वाधिक मतांनी विजय हेच माझं टार्गेट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे मुंबई ।दिनांक १४। खासदार प्रीतम मुंडें यांच्याऐवजी मला पक्षाने खासदारकीचे तिकीट दिल्याने मनामध्ये थोडीशी संमिश्र भावना आहे. पण प्रीतम यांना मी विस्थापित करणार नाही. त्यांना फार काळ काही वाट पाहण्याची गरज पडणार नाही, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली. खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज  पत्रकारांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया देखील यावेळी उपस्थित होत्या. कोणताही धक्का बसलेला नाही ------ पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या,माझ्या पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. पण थोडीशी मनामध्ये संमिश्र भावना आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत. पण आमच्या दोघींपैकी कोणाला तरी तिकीट मिळेल अशी अपेक्षा मात्र नक्की होती. त्यात माझे नाव जाहीर झाल्याने कोणताह