बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा

 अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल रोजी पाठक मंगल कार्यालयात भव्यदिव्य सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन


बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा


बीड दि.१७ (प्रतिनिधी):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा बीडच्या वतीने चैत्र कृ.४ रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी पाठक मंगल कार्यालय नगर रोड ,बीड येथे सकाळी ठिक ११.३१ वा. या शुभमुहूर्तावर भव्यदिव्य, विधिवत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास संत, महंत, वेदमूर्ती, प्रतिष्ठित मान्यवर, महिला पुरुष समाजबांधवाचे मौज सोहळ्यास आशीर्वाद लाभणार आहेत. या संस्कार सोहळ्यत ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा उपनयन संस्कार करावयाचा आहे अशा इच्छुक पालकांनी त्वरीत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी संपर्क ॳॅड.रविंद्र सुधाकरराव देशमुख मो.क्र. ९४२२३३२०५३, ॳॅड.समीर चंद्रशेखरराव पाटोदकर मो.क्र. ९८५०५९०६५६, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी मो.क्र.९२२६८७५६७०, बाळासाहेब जोशी (खडकीकर) मो.क्र.९४२१२७७८२४, नितीशकुमार कुलकर्णी मो.क्र.९८६०७७७५७२ या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा बीडच्या वतीने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ॳॅड. रवींद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, ॳॅड. समीर पाटोदकर, ॳॅड. नरेंद्र होळकर, ॳॅड.आनंद पाटील,  बाळासाहेब जोशी (खडकीकर), राजू कुलकर्णी, विनायक वझे यांच्यासह अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा, सर्व तालुका शाखा, पदाधिकारी, विविध सेलचे  पदाधिकारी, महिला आघाडी आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!