कार्यक्रमांच्या आयोजनांवर राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी

निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म आणि भाषावार कार्यक्रमांच्या आयोजनांवर  राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी



बीड, दि. 16 मार्च (जिमाका)  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम आज जाहीर  केला आहे. आजपासून आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आली असल्याची माहिती पत्रकारद्वारे जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी कळविली आहे. 

जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आलेले आहे, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक  आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध राहतील. 


 प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले असून हे आदेश आज शनिवार दिनांक 16.03.2024 रोजीपासून लागु होतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !