शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव

 शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव



..........

नांदेड दिनांक 15 मार्च प्रतिनिधी

शृंगेरीच्या श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महास्थान दक्षिणाम्नाय श्री शारदापीठ यांच्याकडून नांदेड येथील सौ. अनिता अनिलराव नेरलकर ( आशा प्रभाकरराव चाटूफळे ) यांना श्रीमदभगवतगीतेतील संपूर्ण 18 अध्याय व 700 श्लोक मुखोद्ग्त करण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोख एकवीस हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. श्री श्री विदुशेखर भारती महास्वामी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सौ. अनिता नेरलकर यांनी आजपर्यंत पाचशेहून अधिक भाविकांना गीतेची संथा व अर्थासहित पाठांतर करून घेतले आहे. तसेच शंभरहून अधिक भाविकांना विष्णुसहस्त्रनाम अर्थासहित संथा देऊन पाठांतर करून घेतले आहे. पुणे येथील गीता धर्म मंडळाद्वारे पाच वर्षापासून भगवद्गीतेचे पाठांतर व संथा देण्याचे त्या ऑनलाइन द्वारे अध्यापनाचे कार्य करतात. तसेच योग विद्याधाम नाशिकच्या नांदेड शाखेच्या त्या उपाध्यक्षा व प्राध्यपिका असून प्रवेश परिचय, प्रबोध योगनिद्रा, प्राणायाम शिबिरे यामध्ये त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत व अनेक योगपरीक्षांचे परीक्षक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. श्रीमद्भागवत व देवीभागवत यावरील भागवत विद्यापीठ पुणे यांचा एक वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी विशेष प्राविण्याने पूर्ण केला आहे. कोटी गीता लेखन यज्ञामध्ये त्यांनी स्व हस्ताक्षरांमध्ये संपूर्ण श्रीमद् भागवत तसेच श्री ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आहे. भगवद्गीता पाठांतर करून इतर महिलांना संथा देऊन त्यांचेही पाठांतर करून घेण्याच्या  उपक्रमामुळे दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार होत असल्याचे त्यांनी सांगितले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे. त्याबद्दल नेरलकर परिवाराने व नांदेडच्या अध्यात्मिक व शैक्षणिक चळवळीतून त्यांचे स्वागत केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !