कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय

 अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालयात वसतिगृह बांधकामास 14 कोटी 87 लाख, तर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृह दुरुस्तीसाठी 5 कोटी 48 लाख निधी मंजूर


कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय


मुंबई (दि.16) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीच्या कामास 14 कोटी 87 लाख रुपये तसेच अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी 5 कोटी 48 लाख रुपये असे एकूण 35 कोटी 22 लाख रुपये निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला आहे. 


माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनीही  याबाबत मागणी व पाठपुरावा केला होता.   दोन्ही कामांसाठी एकूण 35 कोटी 22 लाख रुपये इतका निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला असून या दोन्ही वसतीगृहांच्या कामांमुळे येथील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. 


धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून, कृषी विभागाच्या माध्यमातून देखील जिल्ह्यासाठी कृषी भवन त्याचबरोबर जिल्ह्यात सोयाबीन संशोधन केंद्र, यासह शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांसारख्या आस्थापना गेल्या काही दिवसात मंजूर करून त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार