श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, नारायणगड, भगवान भक्तीगडाचे घेणार आशीर्वाद

 बीड जिल्हयाच्या सीमेवर लेकीचं होणार भव्य स्वागत !

२२ तारखेला पंकजाताई मुंडे धामणगांव, आष्टीत ; २३ ला बीड, गेवराईत तर २४ मार्चला परळीत


श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, नारायणगड, भगवान भक्तीगडाचे घेणार आशीर्वाद


बीड ।दिनांक१९।

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं येत्या २२ मार्च रोजी जिल्हयात आगमन होत आहे. जिल्हयाच्या सीमेवर धामणगांव इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या दौऱ्यात पंकजाताई मुंडे जिल्हयाचं श्रद्धास्थान असलेल्या विविध गडांना भेटी देऊन आशीर्वाद घेणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध नेतेमंडळींनाही त्या भेटणार आहेत. 


   पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाने त्यांचा दौरा जाहीर केला आहे. त्यानुसार पंकजाताई २१ मार्चला अहिल्यानगर येथे असणार आहेत. दुसर्‍या दिवशी 

२२ तारखेला त्या सकाळी ११.३० वा. श्रीक्षेत्र मोहटा देवीचं

(ता. पाथर्डी) दर्शन घेणार आहेत. दुपारी १ वा. त्यांचं बीड जिल्हयाच्या सीमेवर धामणगाव

(ता. आष्टी) इथं जिल्ह्याच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर कडा आणि आष्टी इथंही स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुपारी ४.४५ वाजता श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे तर ५.३० वा. सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर जावून राष्ट्रसंत भगवानबाबांचे त्या दर्शन घेणार आहेत. रात्रौ आठ वाजता त्यांचं बीडमध्ये आगमन होणार आहे.  


*श्रीक्षेत्र नारायणगडाचे घेणार दर्शन*

------

२३ मार्च रोजी सकाळी ९.१५ नऊ वा. पंकजाताई मुंडे श्रीक्षेत्र नारायणगडावर जावून संत नगद नारायण महाराजाचे आशीर्वाद 

घेणार आहेत. त्यानंतर पावणे अकरा वाजता बीडमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे निवासस्थानी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालयास भेट, दुपारी सव्वा बारा वाजता गेवराईत माजी आ. बदामराव पंडित यांच्याकडे तर दुपारी सव्वा एक वाजता आ. लक्ष्मण पवार यांच्या

निवासस्थानी त्या सदिच्छा भेट देणार आहेत. गेवराईहून पुन्हा त्या बीड शहरात येणार असून शिवसेना नेते अनिल जगताप यांची निवासस्थानी भेट देणार आहेत. या दौऱ्यात त्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयांनाही भेटी देणार आहेत. 


*बंजारा महिलांसमवेत साजरी करणार होळी*

-------

पंकजाताई मुंडे २४ मार्चला परळीत असणार आहेत. यादिवशी होळीचा सण असल्याने बंजारा समाजातील महिला व बांधवांसोबत त्या होलिकोत्सव साजरा करणार आहेत. दुपारी १ वा. तालुक्यातील कौठळी तांडा येथे हा कार्यक्रम पार पडणार असून त्यांचं स्वागत करण्यासाठी बंजारा महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार