प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतलं वैद्यनाथाचे दर्शन

 परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतलं वैद्यनाथाचे दर्शन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी
        परभणीचे खासदार तथा शिवसेना (उबाठा ) उपनेते संजय उर्फ बंडू जाधव यांनी पंचम ज्योतिर्लिंग  वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
    देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या प्रभू  श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे गुरुवारी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सपत्निक दर्शन घेतले व श्री प्रभू वैद्यनाथाची पूजा, आरती करून  त्यांनी दर्शन घेतले.वैद्यनाथ मंदिराचे पुरोहित राजाभाऊ दगडगुंडे ,योगेश स्वामी यांनी अभिषेक पूजा केली.यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने खासदार संजय जाधव , सौ. क्रांती संजय जाधव यांचे   मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख, इंजिनीयर मुकुंद देशपांडे, लोकमतचे प्रतिनिधी संजय खाकरे ,  शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश चौंडे ,अतुल दुबे, उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या