सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे

 सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे




परळी/ प्रतिनिधी  


   सत्ताधारी व्हा आणि आपले प्रश्न सोडवा हा मोलाचा संदेश बहुजन समाज पार्टीचे संस्थापक  बहुजन नायक काशीराम यांनी बहुजन समाजाला दिला असे प्रतिपादन अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे यांनी केले .ते कांशीराम यांच्या 90 व्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 15 मार्च रोजी कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा संपादक नितीन ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट डी एल उजगरे होते . पुढे बोलताना नितीन ढाकणे म्हणाले की काशीराम यांनी पंधरा विरुद्ध  पंचाऐशी हा सिद्धांत मांडला. व बहुजन समाज सत्ताधारी होऊ शकतो हे दाखवून दिले. यावेळी बाबासाहेबांचे जाती व्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक कांशीराम यांच्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.यावेळी डी.एल. उजगरे बोलताना यांच्या विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच औरंगाबाद येथील जाहीर सभेत कांशीराम यांनी जवळ घेऊन कौतुकाची थाप मारली असे हे सांगितले.

    या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड ,प्रा .दशरथ रोडे ,दैनिक लोकमत समाचार चे अफसर सय्यद, बसपाचे नागसेन सोनवणे ,एडवोकेट बुद्धभूषण उजगरे, एस.के.गीते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक फुले -आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले .तर आभार प्रदर्शन रानबा गायकवाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !