संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

लोकसभेत पंकजाताईंचा सर्वाधिक मतांनी विजय हेच माझं टार्गेट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

 राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं माझ्यासाठी सन्मानजनक ; नवीन जबाबदारी हुरहूर वाढवणारी

पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना


लोकसभेत पंकजाताईंचा सर्वाधिक मतांनी विजय हेच माझं टार्गेट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे


मुंबई ।दिनांक १४।

खासदार प्रीतम मुंडें यांच्याऐवजी मला पक्षाने खासदारकीचे तिकीट दिल्याने मनामध्ये थोडीशी संमिश्र भावना आहे. पण प्रीतम यांना मी विस्थापित करणार नाही. त्यांना फार काळ काही वाट पाहण्याची गरज पडणार नाही, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली. खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज  पत्रकारांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया देखील यावेळी उपस्थित होत्या.


कोणताही धक्का बसलेला नाही

------

पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या,माझ्या पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. पण थोडीशी मनामध्ये संमिश्र भावना आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत. पण आमच्या दोघींपैकी कोणाला तरी तिकीट मिळेल अशी अपेक्षा मात्र नक्की होती. त्यात माझे नाव जाहीर झाल्याने कोणताही धक्का बसलेला नाही. आम्हा दोघी बहिणींमध्ये चांगला समन्वय आहे.


आमच्यात चांगला समन्वय

------

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जबाबदारी दिल्याने मनामध्ये थोडी हुरहुर आहे. कारण मी राज्यात काम करायचे आणि आता मला नवीन झोनमध्ये जावे लागणार आहे. मुळात राज्यात व जिल्ह्यातील राजकारणात मी धोरणात्मक निर्णय घेत असे व प्रीतम मुंडे या वैयक्तिक पातळीवर सर्व गोष्टी सांभाळत होत्या.त्यामुळे दोन्ही बाजू सांभाळण्याचे काम यापुढेही आम्ही करत राहू यात कोणतीही शंका नाही.


राजकारण हा खडतर प्रवास

------

राजकारण हा मुळातच खडतर प्रवास आहे. त्यामुळे राजकीय वनवास संपला असे कधीही म्हणता येणार नाही. पदावर असल्यावर अडचणी नसतात असे मुळीच नाही त्यामुळे हा प्रवास अगदी खडतर असतो, असेही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.


धनंजय मुंडेंमुळे अधिक शक्ती मिळेल

-------

धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नॅचरली जिल्ह्यात आमचा सहभाग आहे. धनंजय मुंडे यांच्याशी माझा संवाद आहे. ते आल्यामुळे आम्हाला कोणताही त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अधिक मताधिक्याने आम्ही निवडून येऊ याची आम्हाला खात्री वाटते.


पंकजाताईच माझ्या नेत्या - खा.डॉ.प्रीतम मुंडे

---------

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार डाॅ. प्रीतमताई मुंडे म्हणाल्या की, पंकजा ताईच माझ्या नेत्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे मला त्यांना कोणताही सल्ला देण्याची गरज नाही. नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सगळे वाट पाहत होतो. त्यादृष्टीने ताईंना आज उमेदवारी मिळाली त्याचा मला आनंदच आहे. सक्षम, अभ्यासू नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेले आहे. माझ्यापेक्षा त्यांनी जास्त काम केंद्रातील नेतृत्वाबरोबर केलेले आहे. त्यामुळे लोकसभेत त्यांना सर्वाधिक मतांनी विजय मिळवून देणं हेच माझं टार्गेट असेल असे त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....