श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक

अलोट गर्दी:पंकजा मुंडेंची पाथर्डीत ओपन जीपमधून मिरवणूक ; फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण


श्रीक्षेत्र मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक

तुमच्या जीवावर मैदानात उतरलेयं; आशीर्वाद अन् साथ द्या

पाथर्डी ।दिनांक २२।

बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल मावशीच्या भूमीत म्हणजे पाथर्डी शहरात आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं अभूतपूर्व असं स्वागत झालं. फटाक्यांची आतिषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण करत अलोट गर्दीच्या साक्षीनं कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पाच वर्ष संघर्ष केला, आता तुमच्या जीवावर मैदानात उतरले आहे, आशीर्वादाची शिदोरी माझ्या झोळीत टाका असं आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलतांना केलं.


   पंकजाताई मुंडे काल नगर येथे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्कामास होत्या. खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यांनी त्यांचं स्वागत केलं. सकाळी नगरहून पाथर्डीकडे रवाना होताना  रस्त्यात मेहकरी फाटा, करंजी, देवराई, तिसगाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठं स्वागत केल्यानंतर पाथर्डीत त्यांचं आगमन झालं. इथं त्यांच्या स्वागताला अलोट जनसागर लोटला होता, त्यांची वाजतगाजत ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. 

तुमच्या जीवावर मैदानात 

------

यावेळी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, मुंडे साहेबांनी पाथर्डीला मावशी म्हटलं आहे, त्यामुळे  परळीपेक्षा हे  माझं लाडक गाव आहे. इथलं स्वागत स्वीकारल्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. काल पुणे येथे मुरलीधर मोहोळ नंतर आज सुजय विखे यांना भेटले, आशीर्वाद दिले. आता पुढे

मोहटा देवीच दर्शन घेऊन तुमचा आशीर्वाद घेऊन माझ्या जिल्हयात पाऊल ठेवणार आहे.आपल्या संघर्षाच्या चर्चा राज्यात नाही तर देशात होतात. मागील निवडणुकीत स्वतःचा विचार केला नाही. सर्वाचा प्रचार केला आणि निवडून आणलं. छत्रपती

शिवाजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालणारी मी आहे. लोकनेते मुंडे साहेबांचा समाजसेवेचा वसा कधीही सोडणार नाही.पाच वर्षे संघर्षात काढले, आता तुमच्या जीवावर मैदानात उतरले आहे. आशीर्वाद आणि प्रेमाला कुठलेही बंधन नसते त्यामुळे आशीर्वादाची शिदोरी माझ्या झोळीत टाका असं पंकजाताई म्हणाल्या.


मोहटादेवीचं दर्शन ; खण-नारळाने भरली ओटी

-------

पंकजाताई मुंडे यांनी दुपारी श्रीक्षेत्र मोहटादेवी मातेचं दर्शन घेतलं. देवीची खण-नारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतले. खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले यांचेसह मंदिर संस्थानचे पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मंदिरात जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी त्यांचं वाहनाचा ताफा थांबवून स्वागत केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !