इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

भव्य कमानी, आकर्षक कटआउट्सने परळी शहर सजले

 लाडक्या लेकिचे उद्या परळी विधानसभा मतदार संघात आगमन !



पंकजा मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी

ढोल - ताशांच्या  गजरात जेसिबीतुन होणार फुलांची उधळण*  *गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक तर कौठळी तांडा येथील होळी कार्यक्रमात होणार सहभागी


*परळी नगरी स्वागतासाठी सजली, भव्य कमानी, आकर्षक कटआऊटसने वेधले लक्ष* 


मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाई - मित्र पक्षांचे आवाहन


परळी वैजनाथ

          भाजपा व मित्रपक्षाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्या दिनांक 24 मार्च रोजी प्रथमच परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आगमन होणार आहे. लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी विधानसभा मतदारसंघ सज्ज झाला असून त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागताची तयारी  करण्यात आली आहे. पंकजाताई मुंडे या प्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. कौठळी तांडा येथील होळी महोत्सवात सहभाग घेतल्यानंतर त्यांचे थाटात परळी शहरात आगमन होणार आहे. ढोल ताशांच्या गजरांमध्ये त्यांच्यावर जेसीबी मधून फुलाची उधळण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

        बीड लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे प्रथमच परळी शहरात येत आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी 10 वाजता परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आगमन होणार आहे. तपोवन शिरसाळा येथील स्वागत नंतर पांगरी चौकामध्ये सकाळी 11 वाजता त्यांचे शानदार स्वागत केले जाणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या गोपीनाथ गडावरील समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्या कौठळी तांडा येथील होळीच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यानंतर त्यांचे परळीमध्ये आगमन होणार आहे.

      इटके कॉर्नर, एक मिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत केले जाणार असून जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाणार आहे.


भव्य कमानी, आकर्षक कटआउट्सने परळी शहर सजले

     पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी नगरी सज्ज झाली आहे ठिकठिकाणी भव्य दिव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत तर शहरात ठिकठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे आकर्षक कटआउट्स  लावण्यात आले आहेत. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये ही कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

     भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या प्रथमच परळी विधानसभा मतदार संघात येणार असून यानिमित्त होणाऱ्या स्वागत कार्यक्रमाला ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई व मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!