महासंवाद बैठक: मनोज जरांगे-पाटील

 आचारसंहिता संपणारच आहे;मग यांच्याशी खेटू - मनोज जरांगे पाटलांचा परळीतून सरकारला इशारा




परळी वैजनाथ, प्रतिनिधी

          मराठा समाजाचा शिक्का काय असतो ते 24 तारखेच्या व्यापक बैठकीतून सकल मराठा समाज निर्णय घेऊन दाखवून देईल असे सांगून विनाकारण खोटे गुन्हे व दडपशाही सरकारच्या इशाऱ्यावरून सुरू आहे. ती बंद करा. आचारसंहितेच्या नावाखाली चालवली जाणारी दडपशाही मराठा समाज खपवून घेणार नाही. आचारसंहिता संपणारच आहे मग यांच्याशी खेटू असा सज्जड इशारा  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील  यांनी सरकारला  परळी येथील महासंवाद बैठकीतून दिला.

             मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज दि. २० रोजी परळी वैजनाथ येथे  महासंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने आचारसंहितेचे कारण सांगून या महासंवाद बैठकीला परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे परळीची मनोज  जरांगे-पाटील  यांची महासंवाद बैठक चर्चेत आली होती. दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने परवानगीसाठी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. त्यानंतर आजच उच्च न्यायालयाने या बैठकीला सशर्त परवानगी दिली. मनोज जरांगे-पाटील  यांचे परळीत जेसीबीने हार घालून भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. 

           बैठकीच्या स्थळी येण्यापूर्वी मनोज जरांगे-पाटील  यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची पूजा करून दर्शन घेतले. परळीच्या मोंढा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महासंवाद बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शैलीत सरकारवर ताशेरी ओढले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, आंदोलनात व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. मात्र सरकार वारंवार मराठा समाजाला फसवत असल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी केला. गृहमंत्र्यांनी मराठा समाजाबद्दलचा द्वेष करणे सोडून द्यावे. सगे सोयरे परिपत्रक सरकारनेच दिले होते. त्याची अंमलबजावणी केली नाही. या ठिकाणीही सरकारने आपली फसगतच केली आहे असे सांगून मराठा समाजाने आपली एकजूट कायम ठेवावी. आपल्यात फूट पाडण्यासाठी असंख्य प्रयोग केले जात आहेत. मात्र आपली ही एकजूट अभेद्य ठेवावी असे आवाहन मनोज जरांगे-पाटील  यांनी केले.

             बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयोग सुरू आहेत. मात्र आम्हीही कायद्याला मानणारे नागरिक आहोत. न्याय देवता आम्हाला वेळोवेळी न्याय देणारच आहे. आज आचारसंहितेच्या नावाखाली मराठा समाजाला दबावात घेण्याचे आणि दडपशाही करण्याचे धोरण सरकारच्या इशाऱ्यावरून प्रशासन करत आहे. मात्र तुम्ही आमचे बॅनर, पोस्टर काढू शकता मात्र आमची एकजूट तोडू शकणार नाहीत. आज आचारसंहिता  आहे ठिकय ही आचारसंहिता संपणारच आहे. एकदा आचारसंहिता संपू द्या मग यांना खेटू अशा शब्दात त्यांनी परळीतून सरकारला सज्जड इशारा दिला. या महासंवाद बैठकीला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मोंढा मैदानावर सकल मराठा समाजाने प्रचंड गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !