39 - बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकाशन :पारदर्शक निवडणुकीसाठी संदर्भिका महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी

 39 - बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकाशन



पारदर्शक निवडणुकीसाठी संदर्भिका महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी



        बीड, दि. 17 मार्च (जिमाका) :-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते 39 - बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकशन आज झाले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी यासाठी ही संदर्भिका महत्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या. 


 


            आज पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संदर्भिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव,   उपजिल्हानिवडणूक अधिकारी  महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते. 


 


            ही संदर्भिका जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, बीड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम, निवडणुकीदरम्यान बनलेल्या  विविध समित्या त्यांचे नोडल  अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक दिलेले आहे. 


एक जानेवारी 2024 च्या आकडेवारीनुसार बीड लोकसभा निवडणूक मतदार संघामध्ये एकूण मतदारांची आकडेवारी, विधानसभा मतदारसंघ व तालुका निहाय मतदार केंद्र,  मतदान केंद्राची माहिती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, माध्यम  प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज, राज्य समितीची तसेच जिल्हास्तरीय समितीची रचना यासह बीड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतचे खासदार, 1952 पासून ते 2019 पर्यंत निवडून आलेले खासदार यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. ही पुस्तिका निवडणुकी कालावधीत पत्रकारांना विशेषतः उपयोगी असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !