नगरकडे जाताना स्वागतासाठी कार्यकर्ते रस्त्या रस्त्यावर ; जेसीबीने फुलांची उधळण

 मिशन लोकसभा - बीड दौऱ्याआधी पंकजाताई मुंडे यांचं पुण्यात जंगी स्वागत


पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळांना दिल्या शुभेच्छा ; ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

पुणे ।दिनांक २१।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचं आज पुण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत झालं. पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.  दरम्यान पुण्याहून नगरकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिक ठिकाणी त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत झालं.


   बीडची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे उद्या नगरमार्गे बीडच्या हद्दीत येत आहेत. धामणगांव आष्टी येथे त्यांच्या मोठया स्वागताची तयारी सुरू आहे. बीडला येण्यापूर्वी त्या आज दुपारी पुण्यात आल्या. आमदार माधुरीताई मिसाळ यांनी त्यांचं निवासास्थानी स्वागत केलं. नंतर  लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. इथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. मोहोळ यांना औक्षण करून त्यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसकर यांच्या निवासस्थानी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


नगरकडे जाताना कार्यकर्ते स्वागतासाठी रस्त्या रस्त्यावर

------ 

पुण्यावरून अहिल्यानगरकडे जातांना वाघोली, शिक्रापूर, कोंडापूरी, रांजणगाव, शरदवाडी, शिरूर, नगर  येथे मोठ्या संख्येने रस्त्या रस्त्यात थांबलेल्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत उस्फुर्त स्वागत केले. रांजणगाव येथे महागणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. नगर शहरात देखील अनेक ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत झालं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !