पोस्ट्स

जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

आर्थिक दुर्बल घटक : शिष्यवृत्तीची रक्क्म झाली दुप्पट

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या शिष्यवृत्तीची रक्क्म झाली दुप्पट  मुंबई, दि. 28 : केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 6 हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता 12 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (National Means cum Merit Scholarship Scheme - NMMSS) सन 2008 पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आतापर्यंत दरवर्षी 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून 4 वेळा देण्यात येत होती आता मात्र दरवर्षी एकाचवेळी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे. NMMSS परीक्षेत Scholastic Aptitude Test (SAT) आणि Mental Ability Test (MAT) अशा दोन्हींमध्ये मिळून किमान 40 टक्के (32 टक्के अजा/अज विद्यार्थ्यांकरिता) गुण असणे आवश्यक असल्याने यापूर्वीची प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. 0000

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचा परळी दौरा. ....

इमेज
विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे परळी दौऱ्यावर परळी वै प्रतिनिधी  दि. 28:- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी  11.00 वाजता लोहा जि. नांदेड येथील श्रीसंत भगवानबाबा जयंतीस उपस्थिती व  नंतर सोयीनुसार लोहा जि. नांदेड येथून परळी वैजनाथ जि. बीडकडे मोटारीने रवाना व परळी जि. बीड येथे आगमन व  मुक्काम. -*-*-*-*-*-*-

परळीत सद्भावना रॅलीने केरळसाठी मदतनिधी संकलन...

इमेज
 एन एस एस व एन सी सी च्यावतीने राष्ट्रीय एकात्मता सद्भावना - केरळ मदत निधी रॅली !  परळी वै: प्रतिनिधी. ... येथील राष्ट्रीय सेवा योजना .व एन सी सी विभाग वैद्यनाथ कॉलेज व कै लक्ष्मीबाई देशमुख महिला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना राष्ट्रीय एकात्मता .केरळ पुरग्रस्त मदत निधीसाठी रासेयो विभागाच्या मुलींनी राखी बांधून सद्भावना संदेश शहर दिला . या रॅलीचे उद्द्याटन वैद्यनाथ कॉलेज येथे नायब तहसिलदार बी एल रुपनर , उपप्राचार्य डॉ जे व्ही जगतकर , उपप्राचार्य डॉ . लक्ष्मण मुंडे डॉ डी व्ही मेश्राम, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता काळे, तालुका पत्रकार संघाचे धनजय अरबुने, पत्रकार मोहन व्हावळे, आत्मसिंग शेटे, अंधश्रध्दा निर्मलन समिती कार्यध्यक्ष प्रा दशरथ रोडे, पत्रकार महादेव गीते, संयोजक प्रा डॉ माधव रोडे, प्रा . गणेश चव्हाण,प्रा डॉ वीरश्री आर्या, प्रा उत्तम कांदे, प्रा सदानंद लोखंडे, प्रा प्रविण फुटके आदि उपस्थिती होते.         एन एस एस व एन सी सी विभाग मुलींनी परळी शहरातुन भव्य रॅली व्दारे वाहन चालक , बस , ट्रक, ऑटोरिक्षा,कार, तसेच शहरातील दुकानादार व्यापारी, नागरिक, पोलिस कर

बाजार समिती कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता. ....

इमेज
*बाजार समित्यांच्या कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावण्याचा अहवाल दाखल*  राज्यातील 307 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सुमारे 7 हजार 51 कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने आपला अहवाल शासनाकडे दाखल केलेला आहे. शासनाने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर स्वस्त धान्य दुकानांमधून वितरीत होणार्‍या शेतमालावरील बाजार फी बंद केली आहे.  खाजगी बाजारांची स्थापना, व्यापार्‍यांना थेट परवाने, कंत्राटी शेती इत्यादी बाबींमधून बाजार समित्यांना मिळत असणार्‍या सेसचे उत्पन्नावर विपरित परिणाम झाल्याने सर्व कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, असा राज्य बाजार समिती सहकारी संघाचा अभिप्राय अहवालात नमूद केला आहे.  समितीच्या शिफारशीमधील पर्याय क्रमांक 1 नुसार समित्यांचे सर्व कर्मचारी शासन सेवेत सामावून घेऊन वेतन, भत्ते शासनाकडून देण्यात यावेत. सन 2017-18 च्या मंजूर अर्थसंकल्पानुसार एकूण आस्थापना खर्च 311.13 कोटी इतका होणे अपेक्षित असून या खर्चात दरवर्षी 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. यामुळे कर्मचारी निर्भयपणे काम कर

नाकर्ते शासन व आडमुठेपणा करणार्‍या बँकेच्या धोरणाविरोधात शेतकरी रस्त्यावर

इमेज
परळीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत धरणे आंदोलन! ● मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती रस्त्यावर ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..                शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत  परळीच्या तहसिलदारांमार्फत शासनाला यापूर्वी  निवेदन देण्यात आले असून, यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या जिव्हाळ्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समितीने आज दि.28 ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी परळीच्या स्टेट बँक ऑफ इंडीया समोर धरणे आंदोलन केले.             शेतकर्‍यांच्या समितीने यापूर्वीच  निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी करा, कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा, सर्व बँकांची कृषी कर्ज वाटपाचे करारपत्रक मराठी भाषेत करा, पीक कर्ज वाटपाचा लक्षांक 100% करा, पीक कर्ज वाटपाच्या प्रति हेक्टर स्केल ऑफ फायनान्समध्ये वाढ करण्यात यावी, आरबीआयच्या सुचनेप्रमाणे 1 लाखापर्यंतचा बोजा शेतकर्‍यांच्या सातबारावर टाकू नये व टाकण्यात आलेला बोजा तात्काळ कमी करण्यात यावा, कर्जमाफी जाहिर केलेल्या तार

परळी तालुक्यात दोन दिवशीय शालेय कुस्तीस्पर्धा

इमेज
*परळी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या तारखेत  कुस्ती स्पर्धा खालील तारखेला होईल याची नोंद घ्यावी* कुस्ती स्पर्धा दिनांक:-03 -09-2018 रोजी वयोगट 14,17,19(मुली) व 14 वर्षे (मुले) सकाळी 9 वाजता वजन घेऊन नंतर कुस्तीस्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. *दिनांक-04-09-2018रोजी वयोगट-17,19वर्षे(मुले) सकाळी 9 वाजता वजन घेऊन नंतर कुस्तीस्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. *ठिकाण-आर्य समाज मंदिर परळी वै.* *वेळ-सकाळी10:00वा.* पंच म्हणून सुभाष नानेकर, प्रा.अतुल दुबे, प्रा.जगदीश कावरे, आनकाडे सर जास्तीत जास्त शालेय कुस्तीस्पर्धा मध्ये मुले व मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.

आजचे........परळी तालुका पर्जन्यमान

इमेज
दि. 28- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        -  निरंक नागापुर           - निरंक पिंपळगाव गा.  - निरंक धर्मापुरी           -  निरंक परळी वै .         - निरंक

काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे. ..महिला सक्षमीकरणाबाबत. ..

इमेज
*महिलांच्या सबलीकरणातूनच येईल ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी*- *ना.पंकजा मुंडे अलिबाग,जि. रायगडदि.27-                  ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून निर्माण होणाऱ्या सबलीकरणातूनच आर्थिक समृद्धी येईल, त्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मिलाप च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन येत्या दोन वर्षात पाच लाख महिला बचत गट स्थापन करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज खारघर येथे केले.          खारघर नवी मुंबई येथील  उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिलाप (Mahaasmita Innovative Livelihood Acceleration Programm) या  नाविण्यपूर्ण  उपजिवीका  गतिवर्धक कार्यक्रमाचे व ग्रामविकास  विकास विभागाने बांधलेल्या  30 दुकान गाळ्यांच्या लोकार्पण  सोहळा आज राज्याच्या  ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यास खा.श्रीरंग बारणे, आ.निरंजन डावखरे, आ.प्रशांत ठाकूर,पनवेल महापालि

🅾...तर आपल्या व्हाट्सॲपवरील डेटा डिलीट होणार

               ⭕ मुंबई - व्हॉट्स अॅप लवकरच आपल्या युजर्सचा डेटा डिलीट करणार आहे. यामध्ये तुमचे मेसेज(चॅटिंग), फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास तुम्हाला १२ नोव्हेंबरपूर्वी बॅकअप घ्यावा लागणार आहे. कारण व्हॉट्स अॅप आपल्या बॅकअप पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्स अॅपमधील डेटा आता तुमच्या डिव्हाइसवर नाही तर गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. व्हॉट्स अॅप आणि गुगलमध्ये झालेल्या डीलनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Video........ 💐💐 परळी वैजनाथ..... दर्शन. 💐💐

इमेज
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. अंबेजोगाई पासून

कसे आहे ?......परळी तालुका पर्जन्यमान ..

इमेज
दि. 27- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        - 16.00 नागापुर           - 16.00 पिंपळगाव गा.  - 14.00 धर्मापुरी           -  12.00 परळी वै .         - 22.00

राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर*

इमेज
*राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर* *मुंबई, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येईल.* *मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे* – *प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध - शनिवार, दि. 1 सप्टेंबर 2018; दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी - शनिवार, दि. 1 सप्टेंबर ते बुधवार, दि. 31 ऑक्टोबर 2018; दावे व हरकती निकालात काढणे - शुक्रवार, दि. 30 नाव्हेंबर 2018 पूर्वी; डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई - गुरुवार, दि. 3 जानेवारी 2019 पूर्वी; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - शुक्रवार, दि. 4 जानेवारी 2019.* *दि. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18 वर्ष

तिसरा श्रावणी सोमवार : वैद्यनाथाचा छबीना व शयनारती .....

इमेज

परळीत शिवभक्तांनी साधली दर्शन पर्वणी! तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त दोन दिवसापासून दर्शनरांगा *

इमेज
परळीत 'हर हर महादेवच्या' जयघोषात शिवभक्तांनी साधली दर्शन पर्वणी!