जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

परळीत शिवभक्तांनी साधली दर्शन पर्वणी! तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त दोन दिवसापासून दर्शनरांगा *

परळीत 'हर हर महादेवच्या' जयघोषात शिवभक्तांनी साधली दर्शन पर्वणी!

* तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त दोन दिवसापासून दर्शनरांगा *

परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ......
             देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या  प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत तिसर्‍या श्रावणी सोमवार निमित्तदर्शनासाठी अपेक्षित गर्दी वाढली असून  मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले. परळी वैजनाथ येथे दर्शन तिसऱ्या सोमवारी घेण्यासाठी महत्त्व दिले जाते. त्यामुळे या सोमवारी इतर सोमवार पेक्षा भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली.
                पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत आज तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक  झाले.काल रविवारीच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठा ओघ सुरू झाला होता.धर्मदर्शन रांगेत कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती  तर सकाळी यामध्ये मोठी वाढ  झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. मोठ्या संख्येने भाविक होणार दाखल होणे अपेक्षित धरूनश्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शंभराहून अधिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर  नजर ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच याठिकाणी पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.   
@@@
पंचक्रोशीतील शिवालये गजबजली. ......
       तालुक्यातील जिरेवाडीचे सोमेश्‍वर, तपोवनचे रामेश्‍वर, टोकवाडीचे रत्नेश्‍वर, धर्मापुरीचे मल्लिकार्जुन, मालेवाडीचे अंधारेश्‍वर, या  ग्रामीण भागातील शिवालयांमध्येही भक्तांनी दिवसभर गर्दी केल्याचे दिसत होते. परळी शहरातील संत जगमित्रनागा, गुरूलिंग स्वामी मंदिर, सुर्वेश्‍वर मंदिरासह विविध महादेव मंदिरांत भक्तांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत होते.
@@@@@@
   भजन, कीर्तन व हरिनामाचा गजर....
              दरम्यान परळी तालुक्यातील विविध गावामधून भाविकांनी येउन दर्शनाचा लाभ घेतला. तसेच भजन, कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रमुग्ध होऊन भाविक भक्तीभावाने भजनानंदात रममाण झाल्याचे चित्र मंदिरे व परिसरात दिसून येत होते.
@@@
मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला.....
    हरि -हर ऐक्य क्षेत्र असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र परळी सोमवार निमित्ताने गजबजली  होती.वैद्यनाथ मंदिर सह शहरातील विविध मंदिरे भाविकांनी गजबजून गेली. दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये ही  मोठी गर्दी केली होती. परळीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक सकाळपासूनच परळीत दाखल होत होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या भाविकांनी रांगा लावून प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?