पोस्ट्स

सप्टेंबर २२, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या मुली उपविजेत्या

इमेज
  जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या मुली  उपविजेत्या  परळी, प्रतिनिधी...              दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बास्केट GVबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेता ठरला आहे. दिनांक 25/सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत बीड जिल्ह्यातुन 35 शाळांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत  14,17,19 वयोगटातील मुले आणि मुलींनी सहभागी झाले होते.   यात सिंदफना पब्लिक स्कूल माजलगाव ने सहभाग नोंदवून जिल्हात अंडर -14 या मुलींच्या ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तर दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या  शिक्षिका कु .संघमित्रा हुमने मॅडम यांच्या टीम ने उपविजेता क्रमांक पटकावला आहे.  या स्पर्धेसाठी जमीर सय्यद इंटरनॅशनल कोच आणि बीड जिल्हा बास्केटबॉल सेक्रेटरी बीड , क्रिडा शिक्षक संजय देशमुख सर यांनी काम पाहिले.     सर्व विजेत्यांचे  किरण गित्ते साहेब ,सचिव त्रिपुरा सरकार व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते, मुख्याध्यापक श

MB NEWS:सलग 9 दिवस,423 कि.मी.86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी

इमेज
रविवार पासून सुनील गुट्टेंची परळी मतदार संघात शेतकरी संवाद यात्रा  सलग 9 दिवस, 9 मुक्काम, 423 कि.मी.प्रवास व 86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी परळी, प्रतिनिधी...         परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते सुनील गुट्टे हे परळी मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा करणार आहेत. रविवार दि.29 सप्टेंबर ते 9 आँक्टोंबर दरम्यान यक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.          युवानेते सुनील गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील डिग्रस येथून या शेतकरी संवाद यात्रेला रविवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ होणार असुन 9 आँक्टोंबर रोजी परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा जवळपास पुर्ण परळी विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.            सलग 9 दिवस,9 मुक्काम,86 गावे,423 कि.मी.अंतर कापत या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधणार आहोत असे युवानेते सुनील गुट्टे यांनी सांगितले.या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, शे
इमेज
  दुःखद बातमी: वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत यांचे निधन  परळी, प्रतिनिधी  परळी येथील बँकनी कॉलनी भागातील रहिवाशी असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत वय 75 यांचे आज दि.26 गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,नरेंद्र भागवत आणि मनोज भागवत अशी दोन मुले,दोन मुली भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे. आज संध्याकाळी 8:30वाजता परळी येथील अमर धाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. परळी शहरातील बँकिंग व्यवसायातील शांत, मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक शिंपी समाजाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यापारी म्हणून नामदेवराव भागवत हे परिचित होते.नाथ चित्र मंदिर जवळ असलेल्या भागवत पॅलेस व भागवत मंगल कार्यालय याचे नरेंद्र भागवत मनोज भागवत यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर आज दि.26 गुरुवार रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतयात्रा राहते घर बँक कॉलनी येथून निघणार आहे. सदैव हसरे व्यक्तिमत्व आणि सर्वांचे सु परिचित असलेले वैद्

युवकांनी मजबुत मनःस्थितीने सकारात्मक जीवन जगावे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  युवकांनी मजबुत मनःस्थितीने सकारात्मक जीवन जगावे - प्रा . डॉ . माधव रोडे मानवत :दि .24/09/2024 .रोजी के .के .एम .महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ कॉलेज,  परळी येथील भौतीकशास्त्र विषयाचे डॉ .माधव रोडे यांचे व्याख्यान आयोजित  करण्यात आले होते . यावेळी प्रा .माधव रोडे  म्हणाले तरूण युवक राष्ट्राचा प्राण आहेत, त्यांनी सकारात्मक  सृष्टी, दृष्टी, वृत्तीतून आपली मन: स्थिती मजबुत करून परिस्थिती बदलावी . युवकांनी नींद, अहम्, वहम् यातून लवकर जागे होऊन स्वतःतील बलस्थाने ओळखावी, मोठं व्हायला ओळख नाही, माणसाचे मन जिंकावी लागतात, माणुसकी जपावी लागते, आई जन्नत असते  तर बाप साया हे लक्षात ठेवावे . पर्यावरणसह मानवी मुल्यांचं संवर्धन करावे . या        आधुनिक युगामध्ये आधुनिक साधनांचा वाढता वापर यामुळे मानवी मूल्यांचे हनन होत आहे .त्या कारणामुळे अशा साधनांचा वापर मर्यादित करावा असा संदेश दिला .आधुनिक साधनांमुळे मानवी जीवनाच्या जिवंतपणाचा ऱ्हास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . प्रा . माधव रोडे त्यांनी आपल्या विनोदी शैलीतू

परळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आणखी एक दावेदारी !

इमेज
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे ॲड.शंकर चव्हाण यांनी मागितली परळी विधानसभेची उमेदवारी..! परळी वैजनाथ (प्रतिनिधी):  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच मंगळवारी बीड जिल्ह्यातील तरूण तडफदार कार्यकर्ते ॲड.शंकर चव्हाण यांनी राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ॲड.चव्हाण यांनी या भेटीत काय घडलं याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. खा.पवारांच्या भेटीवेळी परळी विधानसभा मतदारसंघाचे अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडीकडून आपण स्वतः ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत. असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षानेच ही जागा लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याबाबत खा.पवार साहेब हे सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा आहे असे ॲड.शंकर चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. मुंबई येथे मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची

हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट

इमेज
हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट   परळी वैजनाथ:मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.बीड जिल्ह्याला रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असुन नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.            आज रोजी रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत IMD Mumbai ने दिलेल्या अलर्ट नुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील *छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना Red alert* तर परभणी या जिल्ह्याला orange alert तर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना yellow alert देण्यात आलेला असून त्यानुषंगाने सर्व जिल्ह्यानी आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यकता असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. तसेच संबंधित यंत्रणाना सुसज्ज ठेवून घडणाऱ्या घटनाची माहिती तात्काळ प्रशासनास कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ ता.२४ (बातमीदार)          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.       कार्यक्रमाच्या प्रारंभी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, डॉ एल एस मुंडे, डॉ विनोद जगतकर, डॉ पी व्ही गुट्टे, डॉ राजश्री कल्याणकर, प्रा प्रवीण फुटके आदि मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस केलेल्या माल्यार्पण करण्यात आले. या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ  विनोद जगतकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापने मागील उद्देश सांगून विद्यार्थ्यांत देशसेवा, देशभक्तीचे बीज पेरण्याचे व आदर्श सहकार्याची भावना तयार करण्याचे कार्य रा से यो कसे करते याचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ: सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन मानले आभार! मुंबई:ब्राह्मण समाजाला  स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटीचा भरभरून निधीही उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आज आभार व्यक्त करण्यात आले.      महायुती सरकारने काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन केले.अनेक दिवसांपासून जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला.  राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे ,कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार मानले.यावेळी ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव धर्माधिकारी,परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, ब्राह्मण समाजाचे नेते काकासाहेब कुलकर्णी, भाजप महिला आघाडी प्रदेश प्रकोष्ट डॉ. संजीवनीताई पांडे, शशिकांत बिराजदार, श्रीपाद पाठक आदी  उपस्थित

करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी घेतले प्रभु वैद्यनाथचे दर्शन

इमेज
  करवीर पिठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी घेतले प्रभु वैद्यनाथचे दर्शन परळी वैजनाथ  प्रतिनिधी           करवीर पीठ कोल्हापूरचे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी महाराज यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.                भारतातील प्रमुख चार शंकराचार्य पिठांपैकी श्रृंगेरी  पिठाचे उपपीठ म्हणून ख्याती असलेल्या कोल्हापुर येथील करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी महाराज हे मराठवाड्यात आले होते.  त्यांनी परळी वैजनाथ येथे येऊन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, अनिल तांदळे आदींनी त्यांचे वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.

हार्दिक अभिनंदन:अनुपकुमार कुसुमकर यांची निवड

इमेज
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद: साहित्य तपासणी कार्यशाळा: अनुपकुमार कुसुमकर यांची निवड   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजितकरण्यात आलेल्या दोन दिवशिय साहित्य तपासणी कार्यशाळेसाठी परळी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील विषयतज्ञ शिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.             पत्रकार व शिक्षक म्हणून कार्यरत एक तज्ञ प्रशिक्षक म्हणून  अनुपकुमार कुसुमकर यांची ओळख आहे.नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला जात असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था विविध प्रकारची प्रशिक्षणे व परीक्षणे सध्या करत आहे. या संदर्भाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे ई शैक्षणिक साहित्य टाटा कंपनीकडून सरकार घेत आहे. जगप्रसिद्ध टाटा कंपनीने तयार केलेले हे साहित्य अभ्यासक्रम सुसंगत आहे काय?विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व दर्जेदार आणि चांगले आहे का नाही? यात काय सुधारणा असाव्या? याचे मूल्यांकन करण्यासाठी तज

तीन हजारात सुरू केला छोटा व्यवसाय अन् पंधरा दिवसात बारा हजारांची कमाई

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तीन हजारांतून गृहिणीचे 'स्टार्टअप' ! तीन हजारात सुरू केला छोटा व्यवसाय अन् पंधरा दिवसात बारा हजारांची कमाई परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....           आपल्याकडे एक म्हण आहे 'कर भला, तो हो भला' या न्यायाप्रमाणे उपलब्ध साधनांचा उपयोग करत व्यक्ती काही ना काही करू शकतो. याचे उदाहरणच परळीतील एका गृहिणीने घालून दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मिळालेल्या तीन हजार रुपयांचा विनियोग फिजूल खर्च करून न करता त्याचाच भागभांडवल म्हणून उपयोग करत एका गृहिणीने घरी बसून छोटासा व्यवसाय सुरू केला.विशेष म्हणजे पंधरा दिवसात केवळ 3000 रु.गुंतवणुकीवर या छोट्या व्यवसायातून तिने बारा हजार रुपये कमविले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अतिशय सकारात्मक परिणाम व एक चांगले उदाहरण या निमित्ताने परळीतून पुढे आले आहे.          राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यात माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.या योजनेच्या निमित्ताने संपूर्ण महिलावर्गाचे जनजीवन प्रभावित झाल्याचे बघायला मिळाले आहे. या योजनेचे दोन हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये ज

वाचा:डाॅ.दिपक पाठक यांचा विशेष ब्लॉग>>>>>टार्गेट देवेंद्रजीच का???

इमेज
  टार्गेट देवेंद्रजीच का?????         स द्यस्थितीत आपल्या देशाचे/राज्याचे राजकारण वेगळ्या मार्गाने जात आहे. अलिकडेच लोकसभेचा निकाल लागला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान "संविधान बदल" त्याचबरोबर "अल्पसंख्यांक असुरक्षित" असे नरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केले आणि त्यामुळे यश मिळाले. सध्याच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तसाच काहीतरी फंडा/टुलकीट महाराष्ट्र विधानसभेसाठी वापरण्याचा विचार केला असणार की ज्यामुळे विधानसभेत अपेक्षित यश मिळेल.  त्या अनुषंगानेच विरोधी पक्षांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट करण्याचे ठरवलेले दिसते. त्यासाठी कोणताही नेता देवेंद्रजींना टार्गेट करतोय. जस काही विरोधकांना "देवेंद्रफोबिया" नावाचा आजार झाला आहे. या विधानसभेत विरोधक देवेंद्रजींना खलनायकाच्या रूपात दाखवून (खोटा नरेटिव्ह) मतदारांना परत मुर्खात काढणार असे दिसते.  ज्या प्रमाणे मुघल सैनिकांना प्रत्येक ठिकाणी संताजी धनाजी दिसायचे तसे आज विरोधकांना फक्त देवेंद्रजीच दिसत आहेत. अलिकडेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम मानव यांनी देवेंद्रजी बद्दल गरळ ओकली. ह

दुःखद वार्ता:आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू प्रा.वसंतराव कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

इमेज
आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू प्रा.वसंतराव कांबळे यांचे निधन परळी, प्रतिनिधी......      येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध मिलिंद महाविद्यालयाचे प्रा. वसंतराव कांबळे सरांचे मंगळवार दि.24 रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.    वसंतराव कांबळे सर हे बौद्ध धम्मकार्यात सतत अग्रेसर असणारे, परळी शहरातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, सांस्कृतिक,फुले शाहु आंबेडकर चळवळीत सक्रिय योगदान देणारे ते नेते होते.वसंतराव कांबळे सरांना मंगळवार दि.24 रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांना माधवबाग येथील त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.    आंबेडकरी चळवळीतील अनेक आंदोलनात, सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे.हरहुन्नरी नेतृत्व हरपल्याने सर्व क्षेत्रात दुःखाचे सावट व शोककळा पसरली आहे.दिवंगत वसंतराव कांबळे सरांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.     दरम्यान प्रा. वसंत कांबळे यांच्यावर अंदाजे सायंकाळी 4 च्या सुमारास भीम नगर येथील शांतीवन स्मश

‘मुख्यमंत्री – माझी लाडकीबहीण’ योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला मिळणार

इमेज
  ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २३ : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आज मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. दि.२९ सप्टेंबर २०२४  रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा  राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला. व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

खरेदीचे अधिकार मार्केट कमिटीला देण्याची केली मागणी

इमेज
  बीड जिल्हयात सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत - आ. पंकजाताई मुंडे खरेदीचे अधिकार मार्केट कमिटीला देण्याची केली मागणी बीड।दिनांक २३। शासनाने जिल्हयात आधारभूत किंमत दराने सोयाबीन  खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि खरेदीचे अधिकार मार्केट कमिटीला द्यावेत अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केली राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.     जिल्हयात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, शेतकरी याकडे नगदी पीक म्हणून पाहतात. सध्या जिल्हयात पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सोयाबीन पीक खराब  होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतमाल हंगाम २०२४-२५ साठी जिल्हयात सर्वच ठिकाणी आधारभूत किंमत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक झाले आहे, खरेदी केंद्र सुरू करतानाच त्याचे खरेदीचे अधिकार मार्केट कमिटिला देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलून तमाम शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. ••••

कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही - बाजीराव भैया धर्माधिकारी

इमेज
राज्य सरकारचा मोठा निर्णय: ब्राह्मण समाजासाठी आता स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन ! अमृतसंस्थेचे सर्व लाभही संरक्षीत ; सकल ब्राह्मण समाजाकडून निर्णयाचे जोरदार स्वागत ब्राह्मण ऐक्याने इतिहास घडवला; कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही - बाजीराव भैय्या धर्माधिकारी  मुंबई  प्रतिनिधी....          गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात होती.परळी येथे सर्व संघटनांनी एकत्रित येत गेल्या 25 फेब्रुवारी रोजी ब्राह्मण ऐक्य परिषदही घेतली होती. या ऐक्य परिषदेनंतर या मागणीला ताकदीने शासन दरबारी सादर करण्यात सकल ब्राह्मण समाजाला यश मिळाले. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी याविषयी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या, चर्चा केल्या, सातत्यपूर्ण पाठपुराव्याने व ब्राह्मण ऐक्याने राज्यात एक इतिहास घडला असून आजच्या मंत्रिमंडळ निर्णयात ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.       गेल्या