पोस्ट्स

_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ .....

इमेज
_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ ●  *मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी; उद्घाटनाला सिनेअभिनेत्री अमिषा पटेल* ● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ......       राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव -2018 मध्ये या वर्षीही विविध मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी रसिकांना मिळणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध  सिनेअभिनेत्री अमिषा पटेल च्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.        नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018 मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाथ प्रतिष्ठान च्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून परळीकर रसिकांसाठी मनोरंजन व  सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. मोंढा मैदानावर सर्व कार्यक्रम सादर होणार आहेत.१३ सप्टेंबर रोजी ना. धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पुजा पाटील व पुनम कुडाळकर प्रस्तुत 'तुमच्यासाठी काय पण &

ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन*

इमेज
*ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन* *जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल*  जामखेड दि. ०८ -----  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चौंडी येथे आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भेट देवून त्यांचे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगांवी म्हणजे चौंडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी चौंडी येथे हेलिकाॅप्टरने आगमन झाले. येथील महादेव मंदिरात जाऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर मंदिर परिसरात असणा-या सभागृहात त्यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले.  पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय धाडसाने आलेल्या संकटावर मात करून

वद्य एकादशीच्या पर्वकाळात. .....परळीत दिंड्यांसह भाविकांनी साधली मेरुप्रदक्षिणा......!*

इमेज
*परळीत दिंड्यांसह भाविकांनी साधली मेरुप्रदक्षिणा......!* परळी वैजनाथ /प्रतिनिधी  . ...       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी  आज श्रावणी वद्य एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच दर्शनार्थी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे श्रावणी वद्य एकादशीच्या पर्वकाळात दिंड्यांसह भाविकांनी मेरुप्रदक्षिणा साधली.संत सोपानकाका महाराज दिंडीतील भजनी ठेक्यातील पाउले  लक्षवेधी ठरली.       पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज  देशातील विविध ठिकाणचे भाविक दाखल होतात.श्रावण पर्वकाळ संपत आला असून या महिन्यातील शेवटची दर्शन पर्वणी वद्य एकादशी असते. तसेच वद्य एकादशी ही परळीच्या वारीची एकादशी म्हणून भाविक नित्यनियमाने वारी करतात. आज  श्रावणी वद्य एकादशीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल  झाले होते. दरम्यान मंदिर परिसर भाविकांनीफुलून गेला. दिवसभरात हजारो भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

आजपासून कार, मोटार सायकल महागणार

इमेज
आजपासून कार, मोटार सायकल महागणार नवी दिल्ली - कार किंवा मोटरसायकल विकत घेणं एक सप्टेंबरपासून महागणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (इरडा) या विमा नियंत्रकाच्या निर्देशांनुसार आजपासून दीर्घकालीन थर्ड पार्टी विमा उतरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार इरडाने हे निर्बंध लागू केले आहेत. एक हजार सीसी खालील गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 5,286 रुपये मोजावे लागणार आहेत, एक हजार ते दीड हजार सीसी मधल्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 9,534 रुपये तर दीड हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 24,305 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मोटारसायकलच्या बाबतीत पाच वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यापोटी 75 सीसी खालील गाड्यांना 1,045 रुपये, 75 ते 150 सीसी मधल्या गाड्यांना 3,285 रुपये, 150 ते 350 सीसी मधल्या गाड्यांना 5,453 रुपये तर 350 सीसी वरील गाड्यांना 13,034 रुपये इतका प्रीमियम भरावा लागणार आहे. 🔸मोटर वेहिकल अ‍ॅक्टनुसार थर्ड पार्टी विमा काढणं बंधनकारक आधी हा विमा एका वर्षाचा म

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केंद्र संचालक आरेफ शेख यांचा सत्कार

इमेज
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केंद्र संचालक आरेफ शेख यांचा सत्कार   परळी (प्रतिनिधी):   येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांचा महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्कार करण्यात आले. महावितरण मधील कामगारांच्या पाल्यांना कामगार कल्याण केंद्राच्या शिष्यवृत्ती योजना,    पाठ्यपुस्तक सहाय्य योजना,  एम. एस. सी. आयटी अनुदान  योजना आणी   विविध उपक्रम व कार्यक्रमाचा लाभ श्री. शेख यांनी मिळवून दिला.  यानिमित्त महावितरणचे  अभियंता विजयकुमार वरवटकर यांनी शाल,  श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. शेख यांचा  सत्कार केला. यावेळेस प्रसाद कुलकर्णी, उमा ताटे,  भगवान मंडलीक, प्रकाश परळीकर उपस्थित होते.

परळीत संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!

इमेज
परळीत  संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!  ● शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी ● परळी वैजनाथ  : प्रतिनिधी. ...        राष्ट्रीय  संत भगवानबाबा यांची जयंती परळीत मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने  काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी  ठरली. शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी काढण्यात आली होती.            परळी येथे  भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहराच्या मुख्य मार्गावरून   मिरवणुक काढण्यात आली. यावेळी  प्रतिष्ठीत नागरीक, युवक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. मिरवणुकीमधे भजनी मंडळ, महीला सहभागी होत्या. संत भगवानबाबांच्या घोषनांनी परीसर भक्तीमय झाला होता.

परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता!

इमेज
*परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता! * डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर सोडणार मौनव्रताची सांगता  परळी वैजनाथ/प्रतिनिधी*           डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोनुष्ठान सोहळयाची आज रविवार दि.2 सप्टेंबर रोजी संागता होत असून याच सोबत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आपले मौनव्रताची सांगता होणार  आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.             श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाच्या सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराज उपस्थितांना मुख्य सोहळयात आशिर्वचनही देणार आहेत.यानंतर महाप्रसादाने सांगता होईल.  @@@@     मान्यवरांची लाभणार उपस्थिती. ....              याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ साह्यता निधी संकलन

इमेज
स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ  साह्यता निधी संकलन  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..        स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने, केरळ  साह्यता निधी म्हणून रा.से.यो.च्या वतीने रॅलीचे आयोजन टि.पी.एस.काॅलनी थम॔ल येथे करण्यात आले होते.           केरळमध्ये पावसाने थैमान घातले यात अतोनात नुकसान झाले. जीवित आणि आत्मानी संकटाने हाहाकार माजला ज्यांचे जिव वाचले त्यांच्या साठी भुतलावरील अनेक देश मदतीला धावले आहेत.          या रॅली मध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उपप्राचार्य बी.आर.कोपरे,कार्यक्रमाधीकारी . प्रा. भगवान कदम, प्रा श्रीहरी गुट्टे, प्रा.डाॅ.एल आर मुंडे प्रा. कोकलगावे, प्रा.राख, प्रा बाळासाहेब देशमुख प्रा. व्यवहारे व प्रा.ईतापे, प्रा राठोड, प्रा.राडकर, प्रा.सौ देशमुख, प्रा.सौ सय्यद, प्रा कुमारी गायकवाड, प्रा.लव्हाळे, प्रा देशमुख, इत्यादी या रॅली मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोभायात्रेने जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी

इमेज
शोभायात्रेने  जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी   शोभायात्रेने  जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी  जिरेवाडी   : श्रीरंग मुंडे .... ...        जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.  शोभायाञा, विविध देखावे हे या मिरवणुक सोहळ्याचे आकर्षण ठरले.             जिरेवाडी येथे दरवर्षी भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक ऊपक्रम राबवले जातात. शुक्रवारी जयंतीनिमित्त ह.भ.प. विजयानंद महाराज आघाव यांचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाल.  संध्याकाळी चार वाजता मिरवणुक सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे  नेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी या मिरवणुक सोहळ्याचे ऊद्घाटन केले. आपल्या भाषणात प्रा. टी. पी. मुंडे यांनी  जयंतीच्या यशस्वी आयोजनाबाद्दल राहुल कांदे व त्यांच्या सहका-यांचे कौतुक केले. यावेळी पाटील अंगदराव मुंडे, भगवानराव कांदे, सरपंच गोवर्धन कांदे, जि.प. सदस्य प्रदीप मुंडे, दिपक शिंदे, अशोक दळवे, प्रा. विजय मुंडे, गोविंद बबनदादा फड, सुर्यकांत मुंडे,  भास्करना

परळीत दिड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले*

इमेज
*परळीत दिड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले*  परळी वैजनाथ : प्रतिनिधी           शिक्षणाधिकारी यांच्यासमोर विद्यमान लिपिकाची बाजू मांडण्यासाठी दोन लाखांची लाच मागून त्यापैकी दिड लाखांची रक्कम स्वीकारताना परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले.               २०१२ साली वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. या चौकशीत लिपिक पदाच्या संबंधी बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजावले होते. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली

*विविध जिव्हाळ्याच्या मागण्या घेत ब्राह्मण समाज रस्त्यावर!

इमेज
*विविध जिव्हाळ्याच्या मागण्या घेत ब्राह्मण समाज रस्त्यावर! ● सकल ब्राह्मण समाज केज च्या वतीने धरणे आंदोलन"*● केज / प्रतिनिधी. ... ब्राह्मण समाजाच्या भविष्यकाळा साठी आवश्यक असणाऱ्या जिव्हाळ्याच्या  मागण्या घेऊन आज*दि १ सप्टेंबर २०१८ शनिवार* रोजी केज तहसिल समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.         सकल ब्राह्मण समाज केज च्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले आहेत. या मध्ये विविध समाजाच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येउन ब्राह्मण समाजाच्या मागण्या न्याय असुन यासाठी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे . ●●●●●  आंदोलनाची  पुढील दिशा. ... १)  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलनाची साखळी आंदोलन करण्यात येईल . २)  सर्वानुमते एका ठराविक दिवशी जिल्हा अधिकारी यांना केज येथुन मोटार सायकल रँली काढून निवेदन देण्याचा निर्णय घेतला.

जैन मुनी तरुण सागर यांचे निधन

इमेज
जैन मुनी तरुण सागर यांचे निधन नवी दिल्ली :  जैन मुनी तरुण सागर यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुण सागर कावीळीने आजारी होते. त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. आज दुपारी ३ वाजता दिल्ली-मेरठ महामार्गावरील तरुणसागरम तीर्थ येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.  आपल्या कडव्या आणि स्पष्ट विचारांसाठी तरुण सागर ओळखले जात. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या देखील देशभरात होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतात लाखो अनुयायांनी प्रार्थना सुरु केली होती.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तरुण सागर यांनीच उपचार थांबवून संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. जैन धर्मानुसार संथारा म्हणजे अन्न-पाण्याचा त्याग करत मृत्यूच्या समीप जाणे होय.  परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे...  मुनी तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन आहे. त्याचा जन्म २६ जून १९६७ रोजी दमोह (मध्य प्रदेश) येथील गुहजी गावात झाल

_रस्त्यावरील खड्यांवरून धनंजय मुंडेंचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल_*

इमेज
*_रस्त्यावरील खड्यांवरून धनंजय मुंडेंचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल_* *चंद्रकांत दादा , रस्ते दुरूस्तीवर खर्च केलेले हजारो कोटी कोणाच्या खिशात गेले ?* परभणी दि. 01....................... राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवरून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.  सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आता त्याची दखल घेईल असा मिश्किल टोला लगावतानाच रस्ते दुरूस्तीवर मागील चार वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रूपये नेमके कुणाच्या खिशात गेले ? असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केला आहे. मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. सुप्रिया ताई सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे हे ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनात उडी घेत धनंजय मुंडे यांनी ही आज खड्यासोबत सेल्फी घेऊन तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे.  आज वाशिम येथे एका कार्यक्रमाला जात असताना गंगाखेड-परभणी या रस्त्यावर पडलेल्या खड्यांसमवेत त्यांनी हा सेल्फ

आजचे वैद्यनाथ शयन आरती श्रृंगार दर्शन. ..

इमेज
सर्व छायाचित्रे :राजेंद्रजी सोनी, परळी वैजनाथ. 

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे दुःखद निधन*

इमेज
*माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे दुःखद निधन*  माजलगाव /प्रतिनिधी. .. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डि.बी.फुके यांचे शुक्रवार 31 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते परळी तालुक्यातील हिवरा ( गो.) येथील मूळचे रहिवाशी होते. 1978मध्ये नरहरराव निर्मळ माजलगाव बाजार समितीचे उपसभापती असताना त्यांनी सेवेत प्रारंभ केला.    माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. कमी कालावधीत परळी मार्केटचे सचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी सिरसाळा येथे जयभवानी पतसंस्था उभारून नावारुपाला आणली. सहकार व मार्केटिंग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. शिस्तप्रिय असलेले फुके यांनी माजलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीला यशाच्या शिखरावर घेऊन गेलेे.       शुक्रवारी दुपारी चार वाजता सिरसाळा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.   डि.बी.फुके यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, तीन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने फुके कुटुंबाचा मोठा आधार गेला असून, दुःखाचा डोंगर कोसळला

खोटी माहिती व्हायरल करणे आले अंगलट; वडवणीच्या शिक्षकावर कारवाई

इमेज
 खोटी माहिती व्हायरल करणे आले अंगलट; वडवणीच्या शिक्षकावर कारवाई बीड - मराठा क्रांती मोर्चासंदर्भात आलेली एक खोटी माहिती कुठलीही शहानिशा व्हायरल करणे वडवणी येथील एका शिक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सोशल मीडियावर खोटी माहिती टाकून अफवा पसरविणाऱ्या वडवणी येथील सिंदफणा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दादासाहेब सूर्यभान जाधवर (वय ४०, रा.वडवणी) यांच्यावर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सुशिक्षितांकडूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अफवा पसरविल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. ३० आॅगस्ट रोजी जाधवर यांना टाकरवण येथील शाळेचे मुख्याध्यापक शेळके यांनी सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ या ग्रुपवर मराठा आरक्षणावर त्वरित निर्णय न लागल्यास १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद अशी पोस्ट टाकली. या पोस्टची  कुठलीही शहानिशा न करता ती पोस्ट जाधवर यांनी ‘जिथे बातमी तिथे आम्ही’ या ग्रुपवर टाकून व्हायरल केली. हा प्रकार बीड पोलिसांना समजला. पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी प्रकरणाची शहानिशा करुन दादासाहेब जाधवर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी चूक झाल्याचे कबूल

राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे थाटात भूमिपूजन*

इमेज
*राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचे थाटात भूमिपूजन* *ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने होणारे स्मारक सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान ठरेल -खा. डाॅ. प्रितमताई मुंडे* पाटोदा दि. ३१ -------  प.पू.राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी सर्वांना समतेची, एकतेची शिकवण दिली. अशा या महान संतविभुतीच्या शिकवणीवर चालत लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचित, अनाथ यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. भगवानबाबांच्या चरणी आपले यश, आपला संघर्ष त्यांनी अर्पण केला. हाच वसा ना.पंकजाताई आणि मी वारसा म्हणून चालवत आहोत, त्यांच्या पुढाकाराने आज भगवानबाबांच्या भव्यदिव्य अशा स्मारकाचे भुमिपुजन माझ्या हस्ते होत आहे हे माझे भाग्य आहे. असे प्रतिपादन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रसंत प.पू.भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगांव येथे स्मारकाच्या भुमिपुजन प्रसंगी केले. राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांचे जन्मगांव पाटोदा तालुक्यातील सावरगांव येथे विविध विकास कामांचा आणि भव्यदिव्य अशा स्मारकाच्या कामाचा शुभारंभ खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी त्या

जयंतीदिनी ना.धनंजय मुंडे संत भगवानबाबा चरणी नतमस्तक!

इमेज
जयंतीदिनी ना.धनंजय मुंडे संत भगवानबाबा चरणी नतमस्तक! परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .. राष्ट्रीय संत समाज सुधारक ऐश्वर्यसंपन्न श्री.संत भगवान बाबा यांची जयंती विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे  यांच्या उपस्थीती मध्ये जगमित्र संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पुजन करून साजरी करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,शरदभाऊ मुंडे,सुरेशजी टाक,निलाबाई रोडे,माऊली गडदे,गोपाळराव आंधळे,विजय भोयटे,कीशोर पारधे,शंकर आडेपवार,अनिल आश्टेकर,गोंविंद कुकर,महादेव रोडे,गोंविंद मुंडे, यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थीत होते..!

शेखर अंकल यांना पितृशोक

इमेज
शेखर अंकल यांना पितृशोक परळी वैजनाथ ता.३१ (प्रतिनिधी)               येथील शास्त्रीनगर भागातील जेष्ट नागरिक शिवलिंग लक्ष्मणअप्पा फुटके (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.            शिवलिंगअप्पा फुटके येथील धार्मिक कार्यात सतत आघाडीवर असत, मागील काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी (ता.३०) रात्री १०.३० च्या सुमारास आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. शुक्रवारी (ता.३१) सकाळी ११ च्या सुमारास येथील विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.सहशिक्षक चंद्रशेखर (अंकल) व वैद्यनाथ बँकेतील पिगमी ऐजंट शांतलिंग फुटके यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाबद्दल येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोन मुलं, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या.

इमेज
दोन मुलं, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या. ____________________________________ फुलंब्री /प्रतिनिधी. .. फुलंब्री तालुक्यातील साताळ पिंप्री दोन मुली व पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. दरम्यान, आत्महत्ये मागचे कारण अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.कृष्णा तात्याराव देवरे याने सुकन्या कृष्णा देवरे, हिंदवी कृष्णा देवरे (५), सर्वदा देवरे (६) या तिघांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घरगुती कारणावरून हत्या आणि आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक अर्चना पाटील यांनी वर्तवला आहे.

सोशल मीडिया 'पेड न्यूज' च्या अखत्यारीत येणार ?

इमेज
 सोशल मीडिया 'पेड न्यूज' च्या अखत्यारीत येणार ? मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोग सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपसारख्या समाज माध्यमांना पेड न्यूजच्या अखत्यारीत आणण्याचा विचार करत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग सतर्क झाल्याचे निदर्शनास येत असले तरी ते तांत्रिक दृष्ट्या किती शक्य आहे याची चाचपणी सुरु असल्याचे समजते. देशातील इतर माध्यमांना लागू असलेला पेड न्यूजचा नियम वा कायदा फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि इतर समाज माध्यमांना सुद्धा लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरु केल्याचे वृत्त आहे. कारण देशभरातील राजकीय पक्ष तसेच स्वतःचा वैयक्तिक प्रचार करण्यासाठी समाज माध्यमांसाठी बेसुमार वापर करत असतात. त्यामुळे निवडणूक अयोग सर्व शक्यता तपासून पाहत आहे. वास्तविक समाज माध्यमांवरील जाहिरातींचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की, निवडणूक आयोगाची आचारसंहिता सुरु होताच राजकीय पक्षांचा मोर्चा थेट समाज माध्यमांवर वळेल आणि वाट्टेल त्या ठरला जाऊन पेड जाहिराती केल्या जातील. परंतु ते रोखण्यासाठी आपल्याकडे आणि स्वतः फेसबुककडे सुद्धा देशांतर्गत कोणतीही यंत्रणा उपलब्ध

भानामतीची बनवाबनवी करत पैशांचा पाऊस पाडणारी टोळी जेरबंद.

इमेज
भानामतीची बनवाबनवी करत पैशांचा पाऊस पाडणारी टोळी जेरबंद. _________________________________ बीड - जादुटोणा, भानामती आणि आघोरी विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडून गुप्तधन, सोने काढण्यासाठी एक टोळी बीड जवळील समानपूर येथील राजाभाऊ अंबादास गोरे यांच्या घरी आली होती. याची माहिती मिळताच दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पैशाचा पाऊस पाडणाऱ्या या टोळीला जेरबंद केले. गुरुवारी मध्यरात्री दरोडा प्रतिबंधक पथक पेट्रोलींग करत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना अशी माहिती मिळाली की, बीड जवळील समनापुर येथे राजाभाऊ गोरे यांच्या घरी आज एक टोळी पैशांचा पाऊस पाडणार आहे. या माहितीवरुन दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. राजाभाऊ गोरे यांच्या राहत्या घरी पाच जण जादूटोणा, भानामती, आणि अघोरी विद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडून गुप्तधन काढणार होते. घरात पुजा मांडून हळद कुंकू, लिंबू, नारळ, तांदूळ, नवा कपडा आणि भानामती अशी बनवाबनवी कार्यक्रम चालू असताना दरोडा प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. यावेळी पाच आरोपींना ताब्यात घेतले. यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी शेतकरी राजाभाऊ गोरे यांना आमिष दाखवून पैशाचा

राज ठाकरे म्हणाले. ..नवरात्री नंतर नक्कीच केज येथे सभेसाठी येईन!

इमेज
राज ठाकरे म्हणाले. ..नवरात्री नंतर नक्कीच केज येथे सभेसाठी येईन! केज  ( प्रतिनिधी ) केज तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत खूप उत्सुकता होती . यातच राज ठाकरे येणार म्हणून केज तालुक्यातील जनतेला त्यांना ऐकण्याची ईच्छा होती परंतु राज ठाकरे आले थोडक्यात त्यांनी सांगितले की फक्त आज सभा नाही आणी नवरात्री नंतर नक्कीच केज येथे सभेसाठी येईल असे आश्वासन सुध्दा दिले आणी अवघ्या एक मिनिटांत सभा आटोपली . पंचायत समितीच्या सभागृहात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या . अवघ्या काही मिनिटांनी सुध्दा राज ठाकरे यांना प्रत्यक्ष बघण्याची ईच्छा पुर्ण झाली परंतु ऐकण्याची ईच्छा मात्र अपुरीच राहिली .

महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

इमेज
महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर मुंबई, दि. 31 : राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.  जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे. नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे शासकीय महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्या नियुक्त्या महामंडळ / समिती 1)  हाजी अरफात शेख अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग 2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग 3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ 4)  हाजी एस. हैदर आझम अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ 5) सदाशिव दादासाहेब खाडे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण 6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार उपाध

महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केद्र

इमेज
महाराष्ट्रात सुरु होणार ११ नवीन पासपोर्ट सेवा केद्र नवी दिल्ली, ३१: ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या ३६ होणार आहे .     नागरिकांना त्यांच्या जिल्हयातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला.टप्याटप्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असूनदेशभरात आतापर्यंत  २१८ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात ८७नवीनपासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत  पैकी महाराष्ट्रात ११ नवे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.    पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उ