युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ साह्यता निधी संकलन

स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ  साह्यता निधी संकलन 
परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..
       स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने, केरळ  साह्यता निधी म्हणून रा.से.यो.च्या वतीने रॅलीचे आयोजन टि.पी.एस.काॅलनी थम॔ल येथे करण्यात आले होते.  
        केरळमध्ये पावसाने थैमान घातले यात अतोनात नुकसान झाले. जीवित आणि आत्मानी संकटाने हाहाकार माजला ज्यांचे जिव वाचले त्यांच्या साठी भुतलावरील अनेक देश मदतीला धावले आहेत. 
        या रॅली मध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उपप्राचार्य बी.आर.कोपरे,कार्यक्रमाधीकारी . प्रा. भगवान कदम, प्रा श्रीहरी गुट्टे, प्रा.डाॅ.एल आर मुंडे प्रा. कोकलगावे, प्रा.राख, प्रा बाळासाहेब देशमुख प्रा. व्यवहारे व प्रा.ईतापे, प्रा राठोड, प्रा.राडकर, प्रा.सौ देशमुख, प्रा.सौ सय्यद, प्रा कुमारी गायकवाड, प्रा.लव्हाळे, प्रा देशमुख, इत्यादी या रॅली मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या