परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता!

*परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता!

* डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर सोडणार मौनव्रताची सांगता 
परळी वैजनाथ/प्रतिनिधी*
          डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोनुष्ठान सोहळयाची आज रविवार दि.2 सप्टेंबर रोजी संागता होत असून याच सोबत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आपले मौनव्रताची सांगता होणार  आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.             श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाच्या सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराज उपस्थितांना मुख्य सोहळयात आशिर्वचनही देणार आहेत.यानंतर महाप्रसादाने सांगता होईल. 
@@@@
    मान्यवरांची लाभणार उपस्थिती. ....
             याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, कर्नाटक राज्याचे खाण मंत्री ना.राजशेखर पाटील, सहकार,पणन, वस्त्रोद्योग मंत्री ना.विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर, औरंगाबादचे खा.चंद्रकांत खैरे, बीडच्या खा.प्रीतमताई मुंडे, हिंगोलीचे  खा.राजीव सातव, माजी मंत्री दिलीप सोपल, बीडचे आ.जयदत्त क्षीरसागर, लातूरचे आ.अमित देशमुख, लाईफ केअर हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च सेंटर उदगीरच्या डॉ. सौ.अर्चना पाटील चाकुरकर   आदी अतिथी उपस्थित राहणार आहेत.                 समारोप कार्यक्रमास परळी शहर व परिसरातील नागरिक तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोहळयाचे संयोजक  तपोनुष्ठान सोहळा समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे व वैद्यनाथ देवस्थानचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे व प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रदिपकुमार देशमुख, अनिल तांदळे, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, यशवंत पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 
@@@@
*असे सुटणार  मौनव्रत.....
        डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांनी संपूर्ण तपोनुष्ठान सेाहळा कालावधीत मौनव्रत पाळले असून  कोणताही आहार न घेता विविध वनस्पतींच्या रसाला आहार म्हणून त्यांनी स्वीकारले होते. सकाळी 10 वा. महाराज स्वत:च्या हस्ते खीर तयार करून उपस्थित गुरूवर्यांना खीर देणार आहेत. त्यानंतर ते स्वत: खीर घेणार असून त्यानंतर मौनवृताची संागता होईल. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !